परप्रांतीय फेरीवाल्यांचे अपहरण करून दरोडा टाकून लुटणाऱ्या चार आरोपींना २४ तासात अटक,न्यायालयाकडून चार दिवस पोलिस कोठडी!
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) परप्रांतीय फेरीवाल्यांचे अपहरण करून दरोडा टाकून लुटणाऱ्या चार आरोपींना पाथर्डी तालुक्यातील पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक करून न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची घटना अशी की दिनांक १६ऑगष्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परराज्यातील तीन ईसम १)अजयसींग रजसींग नायक,२) सुशिलकुमार छतरसींग नायक, ३)यादसींह बालकिशन नायक हे तिन परप्रांतीय फेरीवाले त्यांच्या मारुती सुझुकी गाडी नंबर UP 77 AU 2919 या गाडीमध्ये बसून पाथर्डी शहरात वस्तू विक्रीसाठी घेऊन आले असता एकूण ९ संशयीत आरोपींनी त्यांचे गाडीसह अपहरण करून, दमदाटी व मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, गॅस शेगड्या,होम थिएटर,कुलर इत्यादी वस्तू व रोख रक्कम ४९,००० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.आरोपींनी फिर्यादीला त्यांच्याच गाडीमध्ये बसवून पाथर्डीहुन अहिल्या नगर कडे घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या MH 14 JR 3697 या गाडीला जोरदार धडक देऊन दोन्ही गाडी मधिल लोकांच्या दुखापतीस कारणीभूत झाले आहे.अशा आशयाच्या फिर्यादी वरून पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तपासासाठी चार पोलिस पथके तयार करून त्यांनी झटपट २४ तासाच्या आत या गुन्ह्याचा तपास केला.आणि चार आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची (२०ऑगष्ट पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्ह्यातील मुख्य आरोपी १) अंकुश नवनाथ मडके,वय ३६वर्षे, राहणार शिक्षक कॉलनी पाथर्डी,२)शुभम अंबादास कराड वय २३वर्षे, राहणार शिक्षक कॉलनी पाथर्डी,३)केतन दिगंबर जाधव,वय १९,राहणार शिक्षक कॉलनी पाथर्डी ,४) सुहास काशिनाथ ढाकणे वय३४ वर्ष एडके काॅलनी,पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर या चौघांना पाथर्डी तालुक्यातील पोलिसांनी गुन्हा घडल्या पासून चोवीस तासांच्या आत अटक केली आहे.सदर गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी केतन दिगंबर जाधव वय (१९) राहणार शिक्षक कॉलनी पाथर्डी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये मागिल वर्षी २ गुन्हे आणि ठाणे जिल्ह्यातील पोलिस स्टेशनमध्ये १ असे एकूण तिन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.

























