गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा दहावीच्या परिक्षेत दैदिप्यमान यश

गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा दहावीच्या परिक्षेत दैदिप्यमान यश….!!!!_

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा फेब्रुवारी/मार्च २०२२ मध्ये नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाचा निकाल ९८:५८% लागला आहे.
फेब्रुवारी/मार्च २०२२ मध्ये नाशिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत महाविद्यालयाचे एकूण १४१ विद्यार्थी-विद्यार्थिनी परिक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते,त्यात १३९ विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले.७५ विद्यार्थानी विशेष प्राविण्य मिळवले तर ४४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत यश संपादन केले प्रथमस्थान कु. हिरे परिमल सतीश ९१:००%,द्वितीयस्थान कु.पाटील कोमल नितीन ८८:२०%,तृतीयस्थान कु.पवार रीना संदीप ८७:८०%, चतुर्थस्थान कु.जोगी निखिल गुलाब ८७:६०% पटकावत यश प्राप्त केले आहे.
विद्यालयाच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,दुध फेडरेशनच्या संचालिका तथा संस्थेच्या सचिव ताईसाहेब डॉ.पुनम पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव दादासाहेब प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,आदिंनी आनंद व्यक्त करीत सर्व विद्यार्थी तथा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.