अगबाई नुसत्या भेटाभेटीन,बसला घाव जिव्हारी…कसा घायाळ झाला शिकारी… कायमचाच घायाळ झाला शेवगावचा शिकारी
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पुर्वीच्या काळी खेड्यातील लोकांना करमणुकीसाठी तमाषा प्रधान चित्रपटाची निर्मिती केली जात असे.त्याच एका तमाषा प्रधान चित्रपटातील गाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील रामनगर येथील एका शिकाऱ्याच्या झालेल्या खुनाच्या संदर्भात तंतोतंत लागू पडत आहे. (ते गाणे पुढीलप्रमाणे आहे) “ओ अशी घामाघूम का झाली आज ही स्वारी, मान घालून खाली का हो फिरला माघारी… अगबाई नुसत्या नजर बाणांनी, जायबंदी झाली ही स्वारी, कसा घायाळ झाला शिकारी…. हाका घालून उठविल रान,पाय धोक्यात नव्हत भान, अगबाई नुसत्या वैरपणाची कळली आज खुमारी, कसा घायाळ झाला शिकारी… दबा धरून सावज बसलं,झेप घेऊन धावत सुटल, अगबाई नुसत्या पाठशिवीन, झाला मर्द फरारी,कसा घायाळ झाला शिकारी….हाती येवून सुटला मोका, तुमच्या काळजाचा वाढला ठोका, अगबाई नुसत्या भेटाभेटीन, बसला घाव जिव्हारी,कसा घायाळ झाला शिकारी, कायमचाच घायाळ झाला शेवगावचा शि..का..री…. याबाबतची घटना अशी की दिनांक ९ ऑगस्टला २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव हद्दीत उसाच्या शेतात अंदाजे बावीस वर्षे वयाच्या अज्ञात तरूणाचा म्रुतदेह सापडला होता. या बाबत शेवगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ९४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.अहिल्या नगर जिल्ह्यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले श्रीरामपूर विभागाचे विभागीय पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी साहेब यांच्या सुचनेनुसार पोलिस पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ,हुदय घोडके,सागर ससाणे, प्रमोद जाधव,सहायक फौजदार उमाकांत गावडे,यांच्या टीमने हा तपास लावून या प्रकरणाचा उलगडा केला होता.या घटनेतील दोन संशयित आरोपी १) विजय चंदर किडमिंचे,वय (२०वर्षे),२) अरुण लाला उपदे वय( वर्षे १९) दोघेही राहणार रामनगर,शेवगाव शहर, जिल्हा अहिल्यानगर, अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नांवे आहेत. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीसांना अशी माहिती मिळाली होती की या गुन्ह्यात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आकाश लक्ष्मण किडमींचे,(वय २०वर्षे),राहणार शेवगाव शहरातील रामनगर,विभाग, जिल्हा अहिल्यानगर असे आहे.गुन्हा शाखेचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करून या गुन्ह्यातील मयताचे नाव शोधुन काढले होते.आणि संशयित आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.मयत आणि संशयित म्हणून घोषित केलेले दोन आरोपी हे तिघे जण एकाच वेळेस शिकारीला गेले होते.शिकारीत मिळालेला माल कोणी किती घ्यायचा या मुद्यावरून तिघांमध्ये वाद होऊन जोरदार लढाई झाली.मुद्यावरची लढाई गुद्द्यावर आली.तिघामध्ये तुफान हाणामारी झाली.मयताच्या डोक्यावर लोखंडी गजाने वार करत त्याला जोरदार मारहाण केली असता त्या जबर मारहाणीत मयत आकाश किडमींचे याचा मृत्यू झाला आणि आम्ही तेथून पळून गेलो असल्याचा कबुली जबाब वरील दोघांनी पोलिसांना दिला आहे. “शिकारी खुद शिकार हो गया था”. या घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे करीत आहेत. या घटनेमुळे चित्रपट गीताच्या ओळी सारख्या ओठावर येत होत्या “अगबाई नुसत्या भेटाभेटीन बसला घाव जिव्हारी, जिव्हारी… कसा घायाळ झाला शिकारी…. कायमचाच घायाळ झाला शेवगावचा शि.का.री.”