चिकाटीने व नियमित अभ्यास करा यश नक्की मिळेल: तहसीलदार विजय बनसोडे

चिकाटीने व नियमित अभ्यास करा यश नक्की मिळेल: तहसीलदार विजय बनसोडे

 

 

चिकाटीने व नियमितपणे अभ्यास करा यश नक्की मिळेल असे प्रतिपादन पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे आयोजित गणित सप्ताहाच्या बक्षीस वितरण कार्यक्रम मध्ये अध्यक्षस्थानी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना शेख जावेद रहीम तर उद्दिष्टे पदवीधर शिक्षक खिजरोददिन सातभाई यांनी प्रस्तुत केले. आनंददायी वातावरण मध्ये कृतीच्या माध्यमातून कठीण गणित विषयाला सोप्या पद्धतीने शिकवण देणे हा गणित सप्ताह साजरा करण्याच्या उद्दिष्ट होता.मुख्य अतिथी म्हणून केंद्रप्रमुख अब्दुल कदिर हे होते. विजय बनसोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दाखवले की मी सुद्धा पुणे जिल्ह्यातून जिल्हा परिषद मराठी शाळा येथून शिकलेला असून मला जिल्हा परिषद चे विद्यार्थी समोर बोलताना आनंद वाटत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी काही सल्ला दिले. आपल्याला धनप्राप्तीसाठी,नोकर किंवा अधिकारी बनण्यासाठी नाही तर चांगले माणूस बनण्यासाठी व मानवतेची सेवा करण्यासाठी अभ्यास करायचा आहे.कोणत्याही शिक्षक आपल्या विद्यार्थीच्या नुकसान करत नाही त्यांचे आदेशाचे पूर्णपणे पालन करावे तुम्हाला यश नक्की मिळेल. त्यांनी दाखवला आपण लहानपणा पासूनच वाचनाची आवड निर्माण करावी.माझे स्वतःचे एक लायब्ररी आहे .माझ्या मोबाईल मध्ये ही काही बुक्स पीडीएफ फॉर्म मध्ये आहे. प्रवास मध्ये किंवा फ्री टाईम मध्ये मी वाचन करतो.सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल व वाईट संगत पासून दूर राहावे असे त्यांनी आग्रह धरला. बौद्धिक व शारीरिक विकास साठी अभ्यास सोबत खेळ मध्ये ही सहभाग घ्या. जात-पात, पंथ, वर्ग सोडून देश हितासाठी काम करा. आपल्या देश भारत सुंदर देश आहे. थोडके जे असमानता व गरिबी, करप्शन आहे आपल्याला शिक्षण घेऊन, कार्यक्षम बनवून त्याच्याविरुद्ध लढा घेऊन संपवायच्या आहे. तुम्ही उर्दू भाषेत शिकतात. खाजगी शाळा असो किंवा सरकारी, शाळा शाळा आहे. कोणतीही भाषेत शिका,भाषा यश प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करत नाही कारण की मी सुद्धा मराठी माध्यमातून व जिल्हा परिषद शाळेतून शिकलेला आहे. अख्खा पाचोरा तालुका हे माझ्या कुटुंब आहे. त्यांना कधीही गरज वाटल्यास मला आवाज द्या मी नक्की हजर होतील. त्यांनी कन्या उर्दू शाळेतून शिष्यवृत्ती मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे कौतुक करून सत्कार केले. त्यांच्या हस्ते गणित सप्ताह मध्ये प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेले विजेत्यांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी ज्वालामुखी, दगड कोळसा,व वॉटर पुरिफिकेशन कशा पद्धतीने होतात हे मॉडेल द्वारे प्रदर्शनी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रम मध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मोहसीन मूसा खान, इमरान खान,सईद शब्बीर,नासिर शेख, इम्रान शेख, सलमान शेख, वाजिद शेख, इमरान शेख,आसिफ बागवान,अकील बागवान, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुख्याध्यापक एजाज रऊफ, शाएदा हारून, शाहेदा युसुफ,जावेद रहीम, खिजरोद्दिन सातभाई, शोएबा सातभाई,अंजुम इकबाल,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठी संख्या मध्ये पालक वर्ग उपस्थित होते.