पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे मुले पळवणारी टोळी या अफवा वर विश्वास ठेवू नका पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेबांचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना व मार्गदर्शन

पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे मुले पळवणारी टोळी या अफवा वर विश्वास ठेवू नका पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेबांचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना व मार्गदर्शन

पाचोरा, प्रतिनिधी ! ( अनिल आबा येवले )
सध्या महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली असल्याची सर्वत्र अफवा पसरवल्या जात असून अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडल्या नसून किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद नसून या फक्त अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर पाठवणे किंवा शाळेत पाठवले यासाठी पालक लोक चिंतेत पडले असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनीही सूचना केली आहे की, अशा प्रकारच्या कुठेच घडला नसून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका काही संशयित व्यक्ती आढळल्यास पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. व त्या संदर्भात त्या गोष्टीची दखल घेऊन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेबांनी आज दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलिस स्टेशनमध्ये पाचोरा शहरातील सर्व शाळांचे, कॉलेजचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मुख्याध्यापक व शिक्षक यांना सूचना व मार्गदर्शन केले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही विश्वास ठेवू नका व व्हाट्सअप वर अशा प्रकारचे मेसेज वायरल करू नका असे आवाहन देखील तमाम जनतेस केले आहे.