पाचोरा पो.स्टे. हद्दीतील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स

आज दिनांक 16/09/ 2021 रोजी 15.30 ते 16.15 वा.चे दरम्यान पाचोरा पो.स्टे. हद्दीतील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व स्थानिक पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांचा रूट मार्च मा. रॅपिड ऍक्शन फोर्स कंपनीचे श्री.शशिकांत राय डेपोटी कमांडंट यांचे उपस्थितीत घेण्यात आला.
पाचोरा शहरातील संवेदनशील भागाची, मिस्त्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागात रूट मार्च हा मानसिंग मैदान पाचोरा येथून सुरू करुन नगरपालिका चौक, हुसेनी चौक, मच्ची बाजार, आठवडे बाजार, सोनार गल्ली, मुल्लावाडा, जामनेर रोड,असा फिरुन परत मानसिंगा मैदान येथे संपविला आहे. सदर रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स चे 1 पोलीस निरीक्षक, 8 पोलीस अधिकारी, एकूण 81 कर्मचारी तसेच पो.नि.श्री.के. एल नजन यांचे सह 3 पोलीस अधिकारी, 25 अंमलदार व 40 होमगार्ड उपस्थित होते.