पत्रकार विशाल सूर्यवंशी यांना दिली जीवे मारण्याची धमकी

पत्रकार विशाल सूर्यवंशी यांना दिली जीवे मारण्याची धमकी

जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर: आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या लेखणीने समाजातील अन्याय , अत्याचार, भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठवणारे पत्रकाररांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे, यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तर त्यांच्या कुटुंबाना देखील धमकी देण्याचे प्रमाण समाजात वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.
यामुळे खरच पत्रकार हा सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना तुझी पत्रकारिता बंद करा अन्यथा तुला भविष्यात आम्ही पाहून घेऊ असे म्हणत त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर खोटे गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न गुन्हेगारी प्रवृत्तीस चालना देणाऱ्याकडून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीनाही सामोरे जावे लागते आहे.त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे साम्राज्य माजविणार्या विरुद्ध विनाकारण पत्रकारांना त्रास करणाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात येत आहे.