हनुमान टाकळीतील तिरमलदेव वस्ती ते कोपरे शिवरस्त्याच्या कामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न

हनुमान टाकळीतील तिरमलदेव वस्ती ते कोपरे शिवरस्त्याच्या कामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळीतील तिरमलदेव वस्ती ते कोपरे शिवरस्त्याच्या कामाचा भुमिपुजन सोहळा क्रांतीदिनी आणि नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या थाटात संपन्न झाला. मा.जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांच्या हस्ते फीत कापून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे, व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे, हनुमान टाकळी सोसायटीचे चेरमन श्रीराम बर्डे, व्हा चेरमन भाउसाहेब उघडे, माजी चेरमन अशोकराव काजळे, माजी व्हा.चेरमन संजूनाना डमाळ हे व्यासपीठावर उपस्थित होते.प्रथम रस्त्याच्या कामाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.आमदार मोनिकाताई राजळे, यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या 2515 या योजने अंतर्गत हे काम मंजूर करण्यात आले आहे. पन्नास लक्ष रुपये खर्चाचे आणि साधारण पावणे दोन किलोमिटर लांबीच्या या रस्त्याचे प्रथम भराव टाकून खडीकरण करण्यात येणार आहे.सदर रस्ता हा पाथर्डी येथील व्हाईट हाउसवर झालेल्या आमदार मोनिकाताई राजळे आणि मा.खासदार सुजय विखे यांच्या समन्वय बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी या बैठकीला कारखाना संचालक कुशिनाथ बर्डे, मार्केट कमेटीचे सभापती सुभाषराव बर्डे, हनुमान टाकळी सोसायटीचे माजी चेरमन अशोकराव काजळे, सोसायटीचे संचालक संतोष बावणे,हे आवर्जून उपस्थित होते. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागलेली आहे. ९आँगष्ट रोजी क्रांती दिनाच्या मुहूर्तावर या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी सुभाषराव बर्डे यांनी प्रास्ताविकात रस्ता कसा मंजूर झाला त्याचे सविस्तर विवेचन केले. अनेक दिवसांपासून बी एन सी च्या हद्दीतील हे काम रखडलेले होते. लहान मुले, शालेय विद्यार्थी, आजारी डिलेव्हरीच्या पेशंट, आणि या भागातील शेतकरी यांचे रस्त्याने जाताना अतोनात हाल होत होते. या कामामुळे सर्व सामांन्याच्या हाल आपेष्टा थांबणार आहेत. त्यामुळे या भागातील मतदारांनी आमदार राजळे ताई यांचे आभार मानले आहेत. या शुभारंभा प्रसंगी आदिनाथ नागरी पतसंस्थेचे व्हा.चेरमन बाबासाहेब बर्डे, सोसायटीचे संचालक संजय बर्डे,शिवनाथ दगडखैर, ग्रामसेवक अशोक फुंदे, सोपान गायकवाड, बाळू बर्डे, भास्कर बर्डे, संभाजी डमाळ, बापू भगत,विलास सोनवणे, लक्ष्मण डमाळ, तुळशीराम सोनवणे, अण्णा दगडखैर, संजय शिरसाठ, विश्वनाथ दगडखैर, मारुती क्षिरसागर,ठेकेदार आदिनाथ घुले, योगेश उंद्रे,अभियंता योगेश कंगनकर, आणि टाकळी कोपरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार निलेश काजळे यांनी मानले.