कासार पिंपळगावच्या जाऊबाई जोरात,पाच-पाच लाख दोन मंदिरात,स्व.राजीव राजळे यांच्या स्वप्नपूर्ती कडे वाटचाल

कासार पिंपळगावच्या जाऊबाई जोरात,पाच-पाच लाख दोन मंदिरात,स्व.राजीव राजळे यांच्या स्वप्नपूर्ती कडे वाटचाल

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पाथर्डी-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार स्व.राजीवजी राजळे यांनी मांडलेल्या मंदिर बांधण्याच्या संकल्पनेची आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भुमीपुजन करून आणि नारळ फोडून स्वप्नपुर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.२२२ शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या जेव्हा प्रथम आमदार झाल्या त्या वेळी स्व.राजीव राजळे यांनी प्रथम आमदार निधीतून गावातील ग्रामदैवत बिरोबा मंदिरासाठी सभामंडप बांधला होता.आणि लगेचच मंदिर बांधून मंदिरात गरूड या वाहनांवर बसलेली विरभद्राची मुर्ती स्थापन करण्यासाठी ईतर मंदिरातील अनेक छायाचित्रे जमा करण्याच्या सुचनाही दिल्या होत्या.मंदीराचे बांधकाम पूर्ण झाले की स्व.राजीवजी राजळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाच डिसेंबर या दिवशी मोठा लोकार्पण सोहळा साजरा करण्यासाठीचा स्वत: राजाभाऊंनी आराखडा तयार केला होता.परंतू पाच डिसेंबर उजाडण्या आगोदरच सात ऑक्टोबरचा काळा दिवस उजाडला आणि राजाभाऊ राजळे हे आपल्याला सर्वांना पोरके करून अनंतकाळाच्या प्रवासाला निघुन गेले.त्यांच्या आदेशाने बांधलेल्या बिरोबा मंदिराच्या सभामंडपाला त्यांचे पाय ही लागले नाहीत ही खंत अजूनही ग्रामस्थाना स्वस्थ बसू देत नाही.

राजाभाउंचे बिरोबा मंदिर बांधण्याचे स्वप्न अधुरेच राहीले होते ते आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी हनुमान मंदिर आणि बिरोबा मंदिर बांधण्याची घोषणा करून आणि प्रत्यक्ष भुमीपुजन करून माजी आमदार स्व.राजीवजी राजळे यांच्या संकल्प पुर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. हनुमान टाकळीचे हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष परमपूज्य रमेश अप्पा महाराज व सचिव आणि पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांच्या उपस्थितीत व आमदार मोनिकाताई राजळे आणि कासार पिंपळगावच्या सरपंच मोनालीताई राजळे या दोन्ही जाउबाईंच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिर आणि बिरोबा मंदिर जिर्णोध्दाराचा भुमीपुजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ह.भ.प. भाउपाटील राजळे यांचे चिरंजीव रामराव राजळे आणि त्यांच्या सौभाग्यवती संगिताताई रामराव राजळे यांच्या हस्ते ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात हनुमान मंदीरात विधीवत पूजा करण्यात आली.आणि नंतर परमपूज्य रमेश अप्पा महाराज,आमदार मोनिकाताई राजळे, सुभाषराव बर्डे,हरीश्चंद्र दगडखैर महाराज, उपसरपंच आशाताई तिजोरे,ह.भ.प. भाउपाटील राजळे,ह.भ.प. नानासाहेब देशमुख, ह.भ.प.दत्तात्रय महाराज राजळे, सदाशिव तुपे, रामदास म्हस्के सर, विक्रम राजळे सर, राहुलदादा राजळे, शंतनु अर्जुनराव राजळे, माजी सभापती मुरलीधर भगत, उमेश तिजोरे सर, शिवाजी भगत,जनार्दन राजळे, उत्तमनाना राजळे, कांबळे गुरूजी, मंजाबापू चितळे, दिलिप राजळे सर, महादेव शेळके, युवा नेते संदिप राजळे, गणेश भगत,नवनाथ तिजोरे, गोरक्षनाथ राजळे सर,हौसराव राजळे,राधाकिसन राजळे,अरविंद भगत, विठोबा जगताप, तुपे गुरूजी,योहान तिजोरे, ज्ञानदेव राजळे, विनायक भगत, गोरक्षनाथ शिरसाठ, अर्जुन जगताप,अशोक रावसाहेब राजळे, यशवंत मरकड, हनुमंत फाजगे, नंदकुमार बर्डे,अशोक दुधमल, बाबासाहेब शिरसाठ, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, दादासाहेब शेळके, मुकुंद जगताप, आदिनाथ केळकर, हौसराव खंडागळे, देविदास राजळे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,ज्ञानदेव जगताप,नारायण भगत, शेषराव म्हस्के, दादासाहेब पवार या प्रमुख ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून टिकाव टाकून भुमीपुजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.परमपुज्य रमेश अप्पा महाराज म्हणाले की तुम्ही निस्वार्थी भावनेने सुरूवात करा देव सर्व कार्य करून घेतो आपण फक्त निमित्त आहोत.सभापती सुभाषराव बर्डे यांनी ही हनुमान टाकळी येथील हनुमान मंदिर बांधकामांचे अनुभव सांगितले आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आमदार मोनिका ताई राजळे यांनी सांगितले की आपण जाहीर केलेली देणगी लवकरात लवकर जमा करावी आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्वतः वैयक्तिक पाच लाखांची मदत या दोन्ही मंदिराच्या बांधकामासाठी जाहीर केली.तर सरपंच मोनालीताई राजळे यांनी आपले स्व.वडील रावसाहेब कारभारी येवले यांच्या स्मरणार्थ आपले बंधू अभिजित रावसाहेब येवले यांच्या वतीने पाच लाखांची मदत जाहीर केली.या दोन्ही जाउबांईंनी पाच -पाच लाख या जोरदार आकड्यात मदत जाहीर केली आहे.त्यामुळे त्यांचे गावातून जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झाले.ही गावातील सर्वात मोठी देणगी आहे.आसाराम किसन काकडे यांनी आपले वडील कै.किसनराव काकडे यांच्या स्मरणार्थ १ लाख ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे.शिवाजी उत्तम भगत, अशोकराव शिवराम ढगे, मंगेश बाबासाहेब भगत यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.रामराव काशिनाथ राजळे यांनी ५०० गोण्या सिमेंट जाहीर केले.तर संतोष बाबासाहेब शेळके यांनी दोन्ही मंदीरासाठी लाईक फिटींग करून देण्याचे जाहीर केले. सभापती सुभाषराव बर्डे आणि रमेश अप्पा महाराज यांनी प्रत्येकी आकरा हजार रुपये देऊन आणि पावती सुध्दा घेतली.या बांधकाम कार्यक्रमाची रूपरेषा रामदास म्हस्के सर यांनी मांडली, सुत्रसंचालन तुषार तुपे गुरूजी यांनी तर आभार सुहास शेळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सोपानराव तुपे, संभाजी राजळे, विक्रम जगताप, अर्जुन गो.राजळे,राम आठरे,श्रीधर पायमोडे, सारंगधर पायमोडे अंकुश राजळे हे आवर्जून उपस्थित होते. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील व परीसरातील भाविकांनी पावनहनुमान आणि विरभद्र या दोन्ही मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी आणि पावती घ्यावी असे आवाहन ही आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.या दोन्ही मंदिराच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.