जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त १७० रुग्णांची मोफत औषधोपचारा सह तपासणी संपन्न

जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त १७० रुग्णांची मोफत औषधोपचारा सह तपासणी संपन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे खंदे समर्थक आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त तिसगाव येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिरात एकुण १७० रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.तालुक्यातील अनेक गोरगरिब व्रुद्धांना या शिबीराचा फायदा झाला. आंबेवाडी येथील आजीने सांगितले की मी नगरला जाऊ शकत नव्हते पण येथेच माझी तपासणी आणि चश्म्यासह औषधोपचार झाल्यामुळे माझी खास सोय झाली.शिंगवी परीवाराने प्रारंभी जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन केले आणि नंतर नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.शिबीर चालू असतानाच आशिर्वाद मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी लवांडे पाटील रवाना झाले.तेथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यास सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ हे होते.शालिनीताई विखे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की सुजय विखेपाटील हे जरी लोकसभेला पराभूत झाले असले तरी आम्ही खचुन गेलेलो नाहीत.न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.श्रद्धा आणि सबुरी हेच आमचे धोरण आहे.साईबाबा निश्चितच आम्हाला न्याय देतील असे त्यांनी सांगितले.काशिनाथ पाटील लवांडे यांच्या बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की आज अम्रुतमहोत्सव साजरा करताना आनंद होत आहे.विखे घराण्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केले.२० वर्षे सरपंच पद,नंतर सभापती पद भुषविले तसेच लवांडे पाटील यांनी समाजासाठी आंदोलने केली.जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून कार्य केले.विखे पाटला सोबत अनेक पक्षात प्रवेश करून काम केले.वांबोरी चारीसाठीही त्यांनी प्रयत्न केले.विखे हाच आमचा पक्ष असे समजून त्यांनी काम केले.त्यांचे काम पाहुन तुम्हाला आम्हाला प्रेरणा मिळते.आणि पाथर्डीत आल्यावर त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.ते निश्चितच आपल्या वयाची १०० वी साजरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.काशिनाथ पाटलांचे नातू समर्थ आणि नात सम्रुद्धी लवांडे यांनी जीव लावणारे आजोबा या विषयावर छोटेखानी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.पाटलांचे जावंई भाऊसाहेब घोरपडे यांनी सांगितले की दादांच्या गौरवशाली इतिहासाला तडा जाईल असे कोणतेही काम मी माझ्या हातून होऊ दिले नाही.अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना काशिनाथ पाटील लवांडे म्हणाले की मला हा सोहळा साजरा करण्यात अजिबात रस नव्हता पण ज्या लोकांनी माझ्यावर आयुष्यभर प्रेम केले त्या लोकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या सोहळा साजरा करण्यास परवानगी दिली.विखे कुटुंब हेच खरे माझे राजकीय दैवतं आहे.माझ्या राजकीय जीवनात दहा पंचवार्षिक निवडणूका पुर्ण झाल्या. स्व.बाळासाहेब विखे यांच्यामुळेच मला पंचायत समितीचे सभापती पद मिळाले.सर्व समाजाला न्याय देत बरोबर घेऊन मी राजकीय वाटचाल केली. आणि तिसगावचे नाव मोठे केले.किती तरी लोकांचे माझ्यावर उपकार आहेत.जिवाला जीव देणारी माणसं होती म्हणून मी राजकारणात यशस्वी झालो असे लवांडे पाटील यांनी सांगितले.आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हे या सोहळ्यासाठी शेवटच्या क्षणी उपस्थित राहीले.आणि त्यांनी काशिनाथ पाटलांना सुबेच्छा दिल्या.याप्रसंगी काशिनाथ पाटलांचे सुपुत्र भाऊसाहेब लवांडे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान केला.यावेळी माजी सभापती मिर्झा मन्यार, नारायण धस, प्रकाश बुवा रामदासी, चेअरमन भरत गारूडकर,सरपंच मुनिफा शेख, उपसरपंच पंकज मगर,शरद साखरे सर,ससाणे सर,प्रतिक खेडकर,योगिता घोरपडे,राहुल कारखेले, सुनिल शिंगवी,मंसुर पठाण, संजय लवांडे, रफिक शेख,पुरुषोत्तम आठरे,रविंद्र लवांडे मेजर,राजू कटारीया, कुशल भापसे, पिंटूशेठ परमार,महावीर छाजेड, विक्रम ससाणे,सातवडचे संभाजी वाघ, वैभव खलाटे,अमोल वाघ, राजूमामा तागड, लक्ष्मण गवळी, संजय बडे,डॉ. प्रफुल्ल चौधरी, डॉ.पातकळ, डॉ.म्हस्के,डॉ.सौरभ शिंगवी,सार्थक शिंगवी,उपेश ससाणे, भाऊसाहेब लोखंडे यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रितीभोजना नंतर या सोहळ्याची सांगता झाली. या नेत्रतपासणी शिबीराचा लाभ घेतलेल्या अनेक व्रुद्ध रुग्णांनी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिंगवी परीवाराचे आभार मानून आशिर्वाद दिले.