१ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन याचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर फलक लेखन साकारले

१ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन याचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर फलक लेखन साकारले

 

 

निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन याचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलक लेखन साकारले आहे. या फलक लेखनातून एक कामगार तसेच आपला बळीराजा म्हणजेच शेतकरी भर उन्हात , पावसात तसेच कोणत्याही परिस्थितीत काम करत, मोलमजुरी , मेहनत करत आपल्या सामान्य कुटुंबाचे पालन पोषण करत असतो. कामगारांबद्दल तसेच आपल्या बळीराजाबद्दल कृदन्यता व्यक्त करण्यासाठी हे बोलके चित्र शाळेच्या फलकावर साकारण्यात आले आहे . यांतून शाळेचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . शाळेच्या फलकाचा वापर हा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेच न देता त्यांतून विद्यार्थ्यांत सामाजिक सलोखा वाढावा तसेच सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक सण , तसेच विविध उत्सव अथवा सामाजिक विषय घेऊन फलक लेखन करत असतात. सध्या निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा ह्यांचे सामाजिक फलक लेखन समाजात तसेच पाचोरा शहरात चर्चेचा विषय बनत आहेत.

 

कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा

8446932849