लोहटार खडकदेवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणारच श्री अनिल सावंत सर

लोहटार खडकदेवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणारच श्री अनिल भाऊ सावंत सर,

गाळण ( प्रतिनिधि)
येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली असून गाळण बु येथील रहिवासी व गेल्या 25 वर्षांपासून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले तसेच माजी सदस्य गाळण ग्रामपंचायत येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अनिलभाऊ सावंत सर हे येत्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणूक हे जनतेसाठी लढविणारच असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे त्याचप्रमाणे श्री अनिल भाऊ सावंत सर अनेक क्षेत्रात काम करत आहेत ते राजकिय क्षेत्रात गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असून गाळण बु येथील ग्रामपंचायत मध्ये त्यांची महत्वाची भूमिका नेहमी असते त्याच प्रमाणे ते सामाजिक क्षेत्रात देखील विद्यार्थी दशेपासून काम करीत असून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्ह्यातील जिल्हासंघटक म्हणून काम पाहत आहेत तसेच शैक्षणिक क्षेत्रात ते अधीक्षक पदावर काम करीत असून ते महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यावर देखील काम करतात त्याचप्रमाणे ते गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता ह्या क्षेत्रात देखील काम बघत आहेत सहकार क्षेत्रात देखील सुद्धा दादासाहेब गजमलं को ऑप बँक ली पाचोरा येथे देखील 10 वर्षांपासून काम पाहत आहेत एकंदरीत ते राजकीय, सामाजिक,सहकार,पत्रकार, शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक मध्ये ते लोहटार खडकदेवळा गटातून ते निवडणूक लढविणारच या मतावर ते आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच गावातील जनता ही ठाम आहे