गो से हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

गो से हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

एसएससी परीक्षा मार्च 2020-21 मध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
1) सोनवणे कु दिपाली प्रल्हाद- प्रथम(99%)
2) न्याती ऋषिकेश राकेश- द्वितीय(98%)
3) महाजन ललित विकास- तृतीय(97.40%)
4) दाभाडे श्रेयश गिरीश- तृतीय(97.40)
5) राठोड योगिता राजाराम- चवथा(97.20%)
6)पाटील प्रणव अनिल- पाचवा(96.60%)
7) सूर्यवंशी कु प्रियांशू संजय- पाचवा(96.60)

यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत. परीक्षा न घेताच फक्त अंतर्गत मूल्यमापनानुसार हा निकाल लावला गेला आहे त्यामुळे या निकालाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
परिक्षा न घेताच निकाल घोषित झाल्यामुळे या निकालाला काहिसे थट्टेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोविड बॅच, लॉटरी रिझल्ट, मार्कांची खैरात, बिनविरोध पास अशी शेरेबाजी सुरू झाली आहे. त्यामूळे पेढे वगैरे वाटून, कौतुक करण्यासारखे विशेष काहि नाहि अशी कुजकट बोलणी करणारेही काहि महाभाग आहेत. अशावेळी ज्यांनी करोनाच्या या महासंकटात, अत्यंत विपरीत परिस्थितीत, भांबावलेल्या मनस्थितीत, आयुष्यातील एका महत्त्वाच्या परिक्षेचा अगदि जीव तोडून अभ्यास केला आहे अशा विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप तितकीच गरजेची आहे.
       कोरोनाच्या या महाभयंकर संकटाला कशा प्रकारचे नियोजन करावे याचा पुर्वानुभव कोणालाच नव्हता  त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सरकारने हा जो काहि निर्णय शालांत परिक्षेच्या बाबतीत घेतला आहे तो योग्यच म्हणायला हवाय. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अगदि योग्यच आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची जी पद्धती अवलंबली अत्यंत योग्य होती . खऱ्या अर्थाने नववीच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झालं व त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला .त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कौतूकाचा पेढा त्यांच्या तोंडात भरवलाच पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप कुठेही कमी पडणार नाहि याची काळजी सुद्धा घ्यायलाच पाहिजे. ही परिस्थिती व विद्यार्थ्यांची मनस्थिती लक्षात घेऊ पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप भाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ, संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब व्ही. टी. जोशी, मानद सचिव मा ऍड. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब वासुदेव महाजन यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ आयोजित करण्यात आला. व विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत आपले लक्ष विचलित न होऊ देता यश विद्यार्थ्यांनी संपादन केले त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची खूप खूप अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा खलील दादा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी दादासाहेब आकाश वाघ, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ ,पर्यवेक्षक श्री. आर. एल .पाटील ,श्री. एन. आर. ठाकरे, श्री. ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री मनीष बाविस्कर, कार्यालय अधीक्षक श्री अजय सिनकर व दहावीचे वर्ग शिक्षक श्री आर बी बांठिया, श्री डी डी विसपुते, श्री बी एस पाटील उपस्थित व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते