आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वर्धापन दिनी रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना निर्मल सिड्सच्या संचालिका सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी

आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वर्धापन दिनी रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना निर्मल सिड्सच्या संचालिका सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी.

आकाशवाणी जळगाव केंद्राचा 47 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मल सिड्सच्या संचालिका सौ वैशालीताई सूर्यवंशी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री अनिल भोकरे (कृषी उपसंचालक जळगाव), प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील, श्री ज्ञानेश्वर बोबडे (कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी), श्री नरेंद्र डागर (जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र), श्री सतीशजी पप्पू (मा.जेष्ठ उदघोषक), श्रीमती स्मिता दीक्षित (ज्येष्ठ उद् घोषिका), श्री संजय हांडे (संगीतकार) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी *साहित्यिक, सामाजिक व कलाक्षेत्रातील सत्कार मूर्ती -* प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील, श्री अनिल कोष्टी, कवयित्री सौ. माया धुप्पड, मीनाक्षी कदम, डॉक्टर अशोक कोळी, हर्षल पाटील *तसेच कृषी व कृषी संलग्न क्षेत्रातील सत्कार मूर्ती-* निखिल पाटील, मयूर वाघ, स्वाती वैद्य, जागृती सुरंगे, काशिनाथ ढेंगे पाटील व सौरभ येवले या युवा शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.