‘टास’ कडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी प्रेरणादायी सत्राचे आयोजन

‘टास’ कडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी प्रेरणादायी सत्राचे आयोजन

– शिरीष सेबॅस्टियन यांचे शिक्षकांना विशेष मार्गदर्शन

– शिक्षकांना या उपक्रमातून प्रेरणा देण्याचा उद्देश

 

प्रतिनिधी,

 

पुणे – शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी द अकादमी स्कूल (टास) पुणे, येथे प्रख्यात वक्ते आणि शिक्षणतज्ज्ञ शिरीष सेबॅस्टियन यांचे एक प्रेरक आणि प्रेरणादायी सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राच्या माध्यमातून शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. द अकादमी स्कूलमधील शिक्षकांना संबोधित करण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे विचार आणि दृष्टीकोन मांडण्यासाठी शिरीष सेबॅस्टियन यांनी सत्र घेतले होते.

 

हे सत्र केवळ प्रेरणादायी आणि अत्यंत संवादात्मक देखील होते. शिक्षकांमधील सांघिक भावना आणि नेतृत्व कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशाने विविध अँक्टिव्हिटीचा समावेश केला होता. या सत्राची रचना सहकार्य, धोरणात्मक विचार आणि प्रभावी संवाद साधण्यासाठी विचारपूर्वकपणे करण्यात आली होती, अशी माहिती टासच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांनी सांगितले.

 

या सत्रातून वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीस प्रोत्साहन देणारे उपक्रम सेबॅस्टियन यांनी सादर केले. हे सत्र खरोखरच प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन करणारे होते. सेबॅस्टियन यांनी दिलेल्या वास्तविक जीवनातील उदाहरणांमधून त्यांच्याशी जुळवून घेता आलं, त्यामुळे त्यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले संदेश अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत झाली, असे प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.

 

द अकादमी स्कूलच्या शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या सत्रातून शाळेच्या वातावरणात सकारात्मक बदल घडेल. या उपक्रमामुळे द अकादमी स्कूल विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या विकासाला प्रोत्साहन देते आणि मार्गदर्शन करते हे अधोरेखित होते.