नांद्रा येथील पी एस पाटील विघालयाचे खेळाडूची तालुका पातळीवर उत्तुंग यश

नांद्रा येथील पी एस पाटील विघालयाचे खेळाडूची तालुका पातळीवर उत्तुंग यश

नांद्रा(ता.पाचोरा)ता.24येथील शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता .पाचोरा जि जळगांव विद्यालयाने नुकत्यांच संपन्न झालेल्या शासकीय शालेय तालुका स्तरीय मैदानी क्रीड़ा स्पर्धा एम.एम. काॅलेज पाचोरा येथील मैदानावर नांद्रा विद्यालयाने मैदानी क्रीड़ा स्पधेऀत घवघवीत यश संपादन केले. विजयी खेळाडू पुढील प्रमाणे.
१४ वर्ष वयोगटात
गोळा फेक (प्रथम) यामिनी
चंद्रकांत कोळी.
६०० मी धावणे ( द्वितीय)दिशा
दशरथ पाटील.
उंच उडी (प्रथम) जागृती संदिप
पाटील.
थाळी फेक( द्वितीय) प्रसांद
नामदेव मोरे.
*१७ वर्ष वयोगटात*
१००मि धावणे (द्वितीय)
उदय मधूकर पाटील.
८०० मि धावणे व लांब उडी
(प्रथम)
वृषाली ताराचंद पाटील.
१५०० मि धावणे (प्रथम)
स्नेहल रावसाहेब पाटील.
३००० मि धावणे (द्वितीय)
ओम परमेश्वर पवार.
गोळा फेक (प्रथम)
तुषार नथ्थू कोळी.
भाला फेक (द्वितीय)
पायल ज्ञानेश्वर कोळी.
गोळा फेक (प्रथम)
कांचन चंद्रकांत कोळी.
वरिल सर्व खेळाडू खेळाडूची जिल्हा पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली. असून जळगांव येथे खेळण्यासाठी जातील.
विजयी खेळाडूचे संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरुड सचिव दाजीसाहेब सतिष चंद्रजी काशीद महिला संचालिका सौ उज्वलाताई काशीद सह सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड. वसतिगृह सचिव कैलासभाऊसाहेब देशमुख तसेच स्थानिक सल्लागार समितिचे अध्यक्ष डाॅ वाय.जी. पाटील, ग्रा. प.सदस्य अनिल प्रकाश खैरनार ,ग्रा. प. सदस्य योगेश सुर्यवंशी पुंडलिक बडगुजर ( लाजगाव) दैनिक सकाळ पत्रकार राजेंद्र पाटील,मुख्याध्यापक आर.एस. चौधरी ,पर्यवेक्षक एस.व्ही. शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी सवाऀनी खेळाडूचे अभिनंदन केले.
खेळाडूना मार्गदर्शन क्रीड़ा शिक्षक एस. आर.निकम, अविनाश निकम.आर.आर. बाविस्कर,मुख्याध्यापक आर एस चौधरी यांचे लाभले.नांद्रा(ता.पाचोरा) येथील अप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील यशस्वी खेडाळूंचे अभिनंदन करतांना स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ वाय.जी.पाटील,ग्रा.प.सदस्य अनिल खैरनार, योगेश सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक आर.एस.चौधरी, क्रीडा शिक्षक आर.आर.बाविस्कर,एस.आर.निकम, अविनाश निकम यांच्या सह शिक्षक व खेडाळू विद्यार्थी.