Home जळगाव राज्यस्तरीय किशोर/किशोरी खो–खो स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी…!!!!!

राज्यस्तरीय किशोर/किशोरी खो–खो स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी…!!!!!

राज्यस्तरीय किशोर/किशोरी खो–खो स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी…!!!!!

 

 

 

जळगाव – ३९ वी किशोर/किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी दिनांक २३/११/२०२५ वार रविवार रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल.

ठिकाण-जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदान (व.वा.वाचनालय) जळगाव.

या निवड चाचणीसाठी सहभाग घेणाऱ्या खेळाडूचा जन्म दिनांक ०५ फेब्रुवारी २०१२ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेला असावा तसेच नववीपर्यंत शिकत असलेला खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र राहील तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी आमदार चंद्रकांत सोनवणे , प्रा.डी. डी. बच्छाव , गणपतराव पोळ, उदय पाटील, एन.डी. सोनवणे, प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर , सुनिल समदाणे , जयांशू पोळ, सौ.विद्या कलंत्री यांनी केले आहे.सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्र सोबत आणावे.

१)जन्माचा मुळ (ओरिजनल)दाखला
२)ओरिजनल आधार कार्ड
३) शाळेचे आय कार्ड
४) पासपोर्ट साईज फोटो
५) वजन + उंची+वय=२१५
६)ईमेल आयडी
७)मोबाईल क्रमांक

अधिक माहितीसाठी संपर्क

1) राहुल पोळ – 9404292714
2) दत्तात्रय महाजन – 7020751823
3) विशाल पाटील – 9970308326
4) दिलीप चौधरी – 9158469294

Don`t copy text!