शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये पाचोरा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये पाचोरा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

 

 

नुकत्याच जाहीर झालेल्या इ. दहावी निकालातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व पालकांचा गिराणाई शिक्षण संस्था संचालित शिंदे इंटरनॅशनल स्कूल CBSE पाचोरा येथे संचालक मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्वच उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांना आमंत्रित करण्यात आलेले होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने आवर्जून हजर होते. सत्कारमूर्ती विद्यार्थी व पालकांनी आपापले मनोगत व्यक्त करताना शाळेचे व प्रशासनाचे विद्यार्थी केंद्रित अभ्यास , शिस्तीचे आभार मानले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.मा.तात्या साहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे व मेहनतीचे महत्त्व समजावून सांगितले, पालक म्हणून भाजपा युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी पालक व पाल्य यामध्ये कसे मित्रत्वाचे नाते असावे हे सांगितले. सौ.पूजाताई शिंदे, सचिव ऍड. जे.डी .काटकर सर उपाध्यक्ष नीरज मुनोत, सह सचिव प्रा. शिवाजी शिंदे सर यांनी देखील विद्यार्थ्यांच्या हिताने आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विजय पाटील सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण आपल्या पाल्याचे बलस्थान ओळखून त्या त्या विद्याशाखेला प्रवेश घ्यावा. अशा पद्धतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.