मढीच्या यात्रेसाठी वीस वरीष्ठ पोलिस अधिकारी, दोनशे पोलिस कर्मचारी, सव्वाशे होमगार्ड ईतका बंदोबस्त देणार : पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे

मढीच्या यात्रेसाठी वीस वरीष्ठ पोलिस अधिकारी, दोनशे पोलिस कर्मचारी, सव्वाशे होमगार्ड ईतका बंदोबस्त देणार : पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा महोत्सवात वीस वरिष्ठ पोलीस अधिकारी, दोनशे पोलिस कर्मचारी,सव्वाशे होमगार्ड आणि गरजेपुरते पोलिस मित्र ईतका बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.तसेच ड्रोनच्या सहाय्याने गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांच्या हालचाली वर साध्या वेशातील पोलिस अधिकाऱ्या द्वारे करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी दिली.ते कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व सरकारी खात्याच्या विभाग प्रमुख अधिकाऱ्याच्या व यात्रा नियोजन मंडळाच्या बैठकीत बोलत होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब हे होते. शेवगावचे विभागीय पोलिस उपअधीक्षक सुनिल पाटील,पाथर्डीचे तहसीलदार डॉ उद्धव नाईक हे बैठकीतील सांगितलेल्या सर्व प्रकारच्या समस्येवर बारीक लक्ष ठेवून होते. मढीचे सरपंच संजय मरकड म्हणाले की मढीच्या यात्रेतील अनधिकृत दुकानं काढून टाकू.ग्रामपंचायत सर्व दुकानदारांना नोटीस देऊन दुकानाच्या जागेचा उतारा, जीएसटी नंबर,दाखवून खात्री करून घेतल्या नंतरच व्यापाऱ्यांना दुकानं लावण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.गावात ज्यांची दुकानं आहेत त्यांनी शटरच्या आतच आपला व्यवसाय करावा.अनधिक्रुत दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही. मढीच्या यात्रेतील प्रत्येक दुकानदारांना ग्रामपंचायतींची परवानगी घेणे (noc) बंधनकारक करण्यात आले आहे.भगवान मरकड सर म्हणाले की यात्रेतील वाहन तळाचा ठेका कोणालाही देण्यात येवू नये.वाहने उभी करण्यासाठी शेतकरी आपल्या जमिनी मोफत देत आहेत.प्रांताधिकारी प्रसाद मते साहेब म्हणाले की कानिफनाथ हे सर्वांचे श्रद्धास्थान देवस्थान आहे.म्हणून भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्यासाठी येतात त्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामस्थ, देवस्थान आणि प्रशासन यांचे काम आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायतीला‌ सर्वांनी सहकार्य करावे.पोलिस मित्रांना भाविकांशी कसं वागायचं याच ट्रेनिंग द्यावं लागेल. यात्रा काळात चोऱ्या आणि ईतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.तसेच विज, पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था यावर विशेष भर देण्यात येणार आहे.यात्रा नियोजन बैठकीसाठी गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सचिन गवारे, कोषाध्यक्ष बबनतात्याउर्फ राधाकिसन मरकड, विश्वस्त डॉ.विलास मढीकर,अर्जुनराव शिरसाठ,रविंद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड,सचिव सौ.विमल नवनाथ मरकड,रमाकांत मडकर, शामराव मरकड,मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मोहन मरकड,डॉ भगवान दराडे,नारायण जाधव,वैभव देशमुख, वनिता शेवाळे,स्नेहा माळी,यांच्या सह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. शेवटी गावातील दुकानदार व्यापारी वर्गाने सांगितले की ग्रामपंचायतीने अगोदर व्यापाऱ्यांना गाळे बांधून द्यावेत मगच आमची दुकानं उठवावीत.आम्ही ग्रामपंचायत कर भरण्यास तयार आहोत. गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी दुकानांना सीमा रेषा आखून दिलेल्या जागेतच दुकानदारांनी आपला व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. या बैठकीत मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांनी दुकानं लावायची की नाही यावर काही तरी तोडगा निघेल म्हणून अनेक मुस्लिम व्यापारी हजर होते मात्र या विषयावर काहीच चर्चा झाली नाही.