एन.एम .एम एस(NMMS ) परीक्षेत श्री गो.से. हायस्कूल पाचोऱ्याच्या विद्यार्थ्यांचे यश

एन.एम .एम एस(NMMS ) परीक्षेत श्री गो.से. हायस्कूल पाचोऱ्याच्या विद्यार्थ्यांचे यश

पाचोरा (प्रतिनिधी ) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) 24 डिसेंबर 2023 रोजी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पि.टी.सी.(PTC) द्वारा संचलित श्री .गो.से. हायस्कूल , पाचोरा या शाळेतील इयत्ता आठवीचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत व ते शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची नावे 1) अंबेकर ललित बळवंत 2) हर्षदा अनिल जाधव 3)हर्षल शैलेंद्र चौधरी 4 ) खुशी विनोद सिंग राजपूत या विद्यार्थ्यांना शाळेतील उपशिक्षक श्री .अनिल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे मा.अध्यक्ष दिलीप भाऊ वाघ मा. चेअरमन, नानासो .संजय वाघ मा.व्हाईस चेअरमन, मा.सचिव, तथा पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, माननीय सौ .पी .एम. वाघ मॅडम ,उपमुख्याध्यापक ठाकरे सर ,पर्यवेक्षक श्री .आर .एल. पाटील सर ,पर्यवेक्षक ए. बी .अहिरे सर, पर्यवेक्षक सौ. गोहील मॅडम, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले