कोपरे येथे स्व.देउबाई उघडे यांचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

कोपरे येथे स्व.देउबाई उघडे यांचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌‌ शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपरे येथिल हनुमान मंदीरातील सभागृहात स्व.देउबाई मारुती उघडे यांचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.या निमित्ताने ह.भ.प.श्वेताताई महाराज बडे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देउबाईंनी आपला प्रपंच उभा केला होता.त्यांच्या संसार वेलीवर शिवाजीराव,शंकरराव, सखुबाई, बानुबाई, सुनिता ही पाच अपत्ये उमलली होती.संसारात पती मारुतराव यांची त्यांना चांगली साथ लाभली होती.अतिशय गरीबीची परीस्थिती असताना मेंढपाळाचा व्यवसाय करून आणि लोकांच्या शेतात मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले होते.घरात असलेल्या अठरा विश्व दारीद्र्यामुळे मेंढ्या सांभाळताना मुलांच्या शिक्षणाची अत्यंत गैरसोय झाली होती.त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता आले नाही ही खंत त्यांना आयुष्यभर सारखी सतावत होती. सखुबाई आणि बानुबाई या दोन मुलींना अकाली आलेले वैधव्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.परंतू आपल्या नातवाला शिक्षणाचे धडे देउन त्यांनी लहानाचं मोठ केलं होतं.अत्यंत हलाखीची परीस्थिती असताना त्यांना साखर कारखान्याचे ऊसतोडणी मजूर म्हणून काम करावे लागले होते. आजकालच्या अनेक कुटुंबात आई वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीवाडी आणि संपत्तीच्या वाटणी वरून बहीण भावात न्यायालयात खटले सुरू आहेत.परंतू शिवाजीराव आणि शंकरराव यांनी आयुष्यभर आपल्या आई वडिलांना चांगले सांभाळून समाजात एक चांगला आदर्श निर्माण केला होता. आणि आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या विधवा बहिणीच्या मुलांना चांगले सांभाळून मोठा आधार दिला होता.स्व. देउबाई या खरोखरच देव अवतारी होत्या.आयुष्यभर गावात कधीच कोणाशीही भांडणं तंटा केला नाही.घरात आलेल्या कोणत्याही पाहुण्यांचे आदरतीथ्य करुन त्यांना वाटे लावत असत असा त्यांचा हातखंडा स्वभाव होता. त्यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.माणसाने आयुष्यभर किती संपत्ती कमावली याला अजिबात महत्त्व नसते. परंतु त्याच्या म्रुत्यु नंतर च्या विधीच्या वेळी किती जण उपस्थित राहतात हीच त्याने कमावलेली खरी संपत्ती असते असे आपले संत महंत किर्तनातून अध्यात्माचे धडे देउन सांगतं आहे.असे देवाचे नाव घेऊन जन्माला आलेल्या या देउबाई मारुतराव उघडे यांना पुण्यस्मरणा निमित्ताने अनेकांनी त्रिवार विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.