भिल्ल आदिवासी महिलेला भुमिहीन केल्या प्रकरणी दुय्यम सहायक निबंधकासह तलाठी मंडल अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात? महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रकार

भिल्ल आदिवासी महिलेला भुमिहीन केल्या प्रकरणी दुय्यम सहायक निबंधकासह तलाठी मंडल अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात? महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रकार!

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) भिल्ल आदिवासी समाजाच्या सत्तर वर्षीय व्रूद्धेची इनामी जमीन हडप करून भुमिहीन केल्या प्रकरणी दुय्यम सहायक निबंधकासह तलाठी मंडल अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात सापडले आहेत.सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत असताना महसूल मंत्र्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात मात्र सरकारने प्रतिबंधीत केलेल्या आदिवासींना दिल्या गेलेल्या इनामी वर्गातील जमिनीची परस्पर खरेदी करून आदिवासी समाजाच्या सत्तर वर्षीय व्रूद्धेची फसवणूक करून तीला भुमिहीन केले गेले आहे.या प्रकरणी एकूण तेरा जणांच्या विरोधात अहमदनगर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या बाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील निंबळक येथील भिल्ल समाजातील आदिवासी महिला सिंधुताई मुरलीधर निकम वय वर्षे (७१) यांची शासनाने प्रतिबंधीत केलेली इनामी जमीन आहे.त्या जमिनीची परस्पर खरेदी करून हडप केली आणि सदर आदिवासी महिलेला भुमिहीन केल्या प्रकरणी प्रसिद्ध उद्योजक, दुय्यम सहाय्यक निबंधक ,मंडल अधिकारी, तलाठी आणि अहमदनगर शहरातील ईतर तेरा जणांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी अॅट्रासिटी सह विविध कलमान्वये एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुताई मुरलीधर निकम यांनी फिर्याद दाखल केली आहे ‌.सहा महिने हेलपाटे मारूनही एमआयडीसी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही म्हणून सदर महिलेने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार ११ एप्रिल २०२४ रोजी एकूण १३ आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आॅक्टोबर २०१० ते एप्रिल २०२४ या चौदा वर्षांच्या काळात विविध खरेदी खताद्वारे या जमिनीची परस्पर खरेदी विक्री फेर खरेदी करण्यात आली आहे.आपल्या अशिक्षित पणाचा आणि वृद्धापकाळाचा गैरफायदा घेत आपली शुद्ध फसवणूक केली असल्याचे सदर तक्रारीत म्हटले आहे. नगरचे प्रसिद्ध वकील सागर पादीर यांच्या मार्फत न्यायालयात ही खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली होती.त्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.म्हणून एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.या महिलेच्या फिर्यादी नुसार पोलीसांनी १)सरला भगवान छाबरीया, २) दिनेश भगवान छाबरीया,३)आशिष रमेश पोखरणा,४)अजय रमेश पोखरणा,५)आकाश राजकुमार गुरनानी,६)गौतम विजय बोरा, ७)नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया,८) जयवंत शिवाजी फाळके,९) शिवाजी आनंद फाळके,१०) माणिक आनंद पलांडे, ११) तलाठी, हरिश्चंद्र विजय देशपांडे १२) सर्कल, दिलिप श्रीधर जायभाय,१३) दुय्यम सत्र निबंधक कार्यालयातील तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक अधिकारी वर्ग २ या तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१सप्टेंबर २०२३ रोजी तक्रारदार महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती.पण सहा महिने होउनही अकार्यक्षम पोलीसांनी त्यावर चहापाणी घेऊन काहीच कार्यवाही केली नाही.या तक्रारदार आदिवासी महिलेचा आपली स्थावर मालमत्ता बेकायदेशीर रित्या हडप केल्याचा आरोप हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असताना ही पोलीसांनी या कामात हलगर्जीपणा करावा ही पोलिस खात्याच्या द्रुष्टीने अतिशय लांच्छनास्पद बाब आहे.सदर एकाहत्तर वर्षीय महिला ही भिल्ल आदिवासी समाजाची असतानाही पोलीसांनी थोडीशीही सहानुभूती न दाखवता आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे.याची जिल्हा पोलिस अधीक्षक राॅकेश ओला साहेब यांनी दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर असताना गावपातळीवरील आदिवासींच्या या केविलवाण्या अवस्थेला जबाबदार कोण?या सर्व सामान्य माणसाला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर कोण देणार.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातही अनेक गावांत देवस्थानच्या नावे असलेल्या इनामी वर्गातील जमिनी काही धनदांडग्यांनी हडप केलेल्या आहेत.तसेच शेवगावातील मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना सिलिंगच्या काळात काही जमिनी वाटत करण्यात होत्या.सरकारने दिलेल्या जमिनीची ही काही लॅंड माफियांनी किरकोळ भावाने खरेदी करून त्याचे प्लाॅट पाडून सर्रास चढ्या भावाने विक्री केली आहे. शेवगावातील लॅंडमाफीया हे गब्बर झाले आहेत.त्यांनी शहरात विविध ठिकाणी आपले कार्यालये थाटली आहेत.नेवासा तालुक्यातील जिवंत व्यक्ती मयत दाखवून परस्पर जमीन नावावर केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.हे प्रकरण ताजे असतानाच आता हे आदिवासी महिलेचे प्रकरण उघड झाले आहे.महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील याच जिल्ह्यातील असुन त्यांच्याच खात्यातील गैरकारभार ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाट्यावर आला आहे.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधित आदिवासी समाजाच्या महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही आदिवासी समाजाच्या महीलांच्या वतीने करण्यात आली आहे. नगर नेवासा शेवगाव -पाथर्डी या तालुक्यात सरकारी जमिनी हडप करण्याच्या गैरकारभारामुळे महसूल खात्याची लक्तरे चांगलीच वेशीवर टांगली गेली आहेत.ना.राधाक्रुष्ण विखेपाटील या प्रकरणी नेमकी काय कडक कारवाई करतात याकडे संपूर्ण आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात चाललेल्या सावळ्या गोंधळाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.