सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र पाटील यांची निवड

सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र पाटील यांची निवड

सामनेर ता.पाचोरा
सामनेर येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र तापीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी उपसरपंच बाळकृष्ण जगन्नाथ पाटील यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर दि 6 रोजी रवींद्र तापीराम पाटील यांनी उपसरपंचासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिन विरोध निवड करण्यात आली सरपंच संगीता भोलेनाथ भिल्ल यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड करण्यात आली.यावेळी बाळकृष्ण पाटील,महेंद्र साळुंखे ,,कोकिळाबाई पाटील ,मालतीबाई चव्हाण ,पुनम साळुंखे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी टी.पी .मराठे यांनी पाहिले.त्यांच्या निवडीबद्दल पाचोरा भडगाव माजी आमदार दिलीप वाघ ,पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ ,राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे ,तालुका अध्यक्ष विकास पाटील, पंचायत समिती माजी गटनेते ललित वाघ ,आदीनी अभिनंदन केले यावेळी प्रा.राजेंद्र साळुंखे, प्रशांत साळुंखे,भालचंद्र चव्हाण,भोलेनाथ भिल्ल,शिवाजी चव्हाण,मकरंद पाटील ,प्रशांत सूर्यवंशी,नितीन पाटील आदी उपस्थित होते .