अस्सुफा इंटरनॅशनल स्कूल येथे पवित्र रमजानची इफ्तार साजरा

अस्सुफा इंटरनॅशनल स्कूल येथे पवित्र रमजानची इफ्तार साजरा

पाचोरा शहराची नावलौकित अससुफा इंटरनॅशनल स्कूल येथे शाळेतील रोजा (उपास) ठेवणारे 40 विद्यार्थी साठी पवित्र रमजान महिना सुरू असल्याने *दावते इफ्तार* कार्यक्रमाच्या आयोजन शाळेमार्फत करण्यात आला.दावते इफ्तार कार्यक्रम मध्ये भूक प्यास सहन करून उपास ठेवणारे विद्यार्थ्यांच्या मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्देश लहान मुलांना प्रोत्साहना देऊन नैतिक शिक्षण देणे व भविष्य मध्ये समाज व देशसाठी चांगला शहरी तयार करणे हे होता. कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून, संस्थाचालक हाजी मुस्लिम बागवान, केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर, ऍक्टिव्ह शिक्षक शेख जावेद रहीम, पदवीधर शिक्षक रेहान खान उपस्थित होते. मान्यवरांनी आपले भाषण मध्ये उपास ठेवणारे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक वर्ग ,शाळा प्रशासनाचे कौतुक व मार्गदर्शन केले. कार्यक्रम मध्ये शाफियोद्दिन ठेकेदार, रज्जू बागवान, हारून बागवान, जाकीर अलाउद्दीन,अकरम कुरैशी,आकिब सर, सईद शब्बीर, तारिक सय्यद, मुख्याध्यापक अब्दुल एजाज, सलाउद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी शाळा कॉर्डिनेटर डॉक्टर मूसेफ, मुख्याध्यापक फहीम कुरेशी, निकहत शेख, सना खान, रिफत देशमुख, फरजाना शेख, शेख साहेब यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मध्ये मोठी संख्या मध्ये पालक वर्ग उपस्थित होते.
डॉक्टर मुसेफ यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.