एस एस एम एम महाविद्यालयात रानभाजी महोत्सव संपन्न

एस एस एम एम महाविद्यालयात रानभाजी महोत्सव संपन्न

 

दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी पाचोरा येथे एस एस एम एम महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.21व्या शतकात रानभाजीचे विद्यार्थ्यांना माहिती व्हावी रानभाजी म्हणजे निसर्गातील रानमेवा असतो त्यापासून आरोग्याला खूप फायदे होत असतात आरोग्यासाठी हा रानमेवा कायम स्वरूपी फायद्याचाच आहे आज फास्ट फूड च्या युगात आपण या रानमेवा पासून लांब चाललो आहे आणि म्हणून पुन्हा विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे आध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील होते. या महोत्सवाचे उद्घाटन सौ.सुचेताताई वाघ सौ ज्योतीताई वाघ यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून पा.ता सह.शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी,प्रगतिशील शेतकरी मयूर वाघ उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दविपप्रजवलनाने झाली तसेच सुचेताताई वाघ ज्योतीताई वाघ यांनी मार्गदर्शन केले प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले या वेळी मयूर वाघ यांचा सत्कार करण्यात आला शेतीतून ही करियर करता येते असा संदेश मयूर वाघ यांनी विद्यार्थ्यांना दिला उपप्राचार्य डॉ वासुदेव वले,उपप्राचार्य डॉ जे व्ही.पाटील व्यासपीठावर उपस्थित होते या रानभाजी महोत्सवामध्ये साक्षी पाटील प्रियंका धनगर यांनी घोळाची भाजी,कश्यप घोडके हिने कंटूरले भाजी,संस्कृती पवार काझी झोया हेमांगी पाटील मयुरी जाधव या विद्यार्थिनीनी गंगाफळ भाजी,निकिता पाटील काजल पाटील यांनी तरोटा भाजी,पूजा सोनार भूमिका शिवदे यांनी आघाड्याची भाजी,वैष्णवी पाटील तेजस्विनी पाटील यांनी अंबड झुक्याची भाजी,सानिका महाजन पूनम माळी प्रतीक्षा मोरे यांनी चीवळ भाजी,स्नेहल पाटील गायत्री पाटील यांनी घोळाची भाजी व दसम्या, वरद सोनार आदित्य राजपूत या विद्यार्थ्यांनी आंबट चुकाची भाजी, दिव्या पाटील चेताली धनगर यांनी कंटूरले भाजी,दिव्या पाटील अंबाडचुका भाजी,मयुरी पाटील घोळ भाजी घोळाचे फुनके, प्रीती सोनवणे पुनम कुंभार यांनी फांगची भाजी, मयुरी नागणे हर्षदा पाटील चीवळी भाजी,प्रांजली कोळी पोकळ्याची भाजी किमया क्षीरसागर अंबड चूका भाजी,प्रियंका पाटील आंबट चुका पिठले,ऋतुजा पाटील दिव्या सोमवंशी पुदिन्याची चटणी खुशेंद्र वाघे रिद्धेश वायभाषे यांनी कृष्णा वाघ खमंग पुदिना चटणी,पवन पाटील अल्फराज शेख अल्ताफ तडवी कटूरलेभाजी, याशिका मदनानी गंगाफळ भाजी अशा अनेक रानभाज्या विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या होत्या या रानभाज्यांपासून आरोग्याला होणारे फायदे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रात्यक्षिकांमधून समजावून सांगितले या महोत्सवाची मूळ संकल्पना प्रा.शितल पाटील यांची असून यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख वैशाली कोरडे तर आभार प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रदीप रुद्रसवाड यांनी मांडले यावेळी प्रो.डॉ.जे.डी गोपाळ प्रा.एस टी सूर्यवंशी डॉ.के एस इंगळे प्रा.डॉ एस बी तडवी प्रा.पी एम डोंगरे प्रा.वाय बी पुरी प्रा.राजेश वळवी प्रा.डॉ.माणिक पाटील प्रा.स्वप्निल भोसले प्रा.अतुल पाटील डॉ.शरद पाटील प्रा.अमित गायकवाड प्रा.डॉ.शारदा शिरोळे प्रा.प्राजक्ता देशमुख प्रा.सुवर्णा पाटील प्रा.नितीन पाटील प्रा.विशाल कापसे प्रा.प्राजक्ता शितोळे प्रा क्रांती सोनवणे प्रा.उर्मिला पाटील प्रा.सरोज अग्रवाल प्रा.कृतिका गोसावी प्रा. डॉ.वैष्णवी महाजन प्रा.संजिदा शेख,प्रा.मेघा मराठे प्रा.गायत्री भोसले प्रा.श्वेता देव मच्छिंद्र जाधव,सुनील नवगिरे बी.जी पवार,सुरेंद्र तांबे,गोपाळ चौधरी,जयेश कुमावत,घनश्याम करोसिया तसेच प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.