आपला सनातन धर्म विश्व कल्याणाची कामना करतो, धर्मांतर होऊ देऊ नका – पू. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी

आपला सनातन धर्म विश्व कल्याणाची कामना करतो, धर्मांतर होऊ देऊ नका – पू. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी

जामनेर, 28 जानेवारी

अ. भा.हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाजाचा कुंभ गोद्री येथे 25 जानेवारी पासून सुरू झाला आहे. 28 रोजी कुंभाच्या चौथ्या दिवशी धर्म सभेत घराघरात आपला सनातन धर्म विश्व कल्याणाची कामना करतो, धर्मांतर होऊ देऊ नका. घरोघरी “हां म हिंदू छु” चे स्टिकर लावा असे प्रतिपादन महामंडलेशवर जनार्धन स्वामी यांनी केले.

या वेळी मंचावर पू .बाबूसिंग महाराज ,पू .गोपाल चैतन्य महाराज ,मा. शरदराव ढोले, पू. सुरेशजी महाराज, पू. गोवर्धन महाराज, मा. शाम हरकरे, पू विष्णू महाराज, डॉ . गणेश राठोड, पू. विश्वेशरानंद महाराज, संत सिद्धेश्वरी दीदी, डॉ .रणजित सिंग नाईक (गुजरात), संत हिम्मत महाराज, पू. महामंडलेशवर जनार्धन हरी महाराज, पू. राघवानंद महाराज , पू. महामंडलेशवर विश्वेश्वरानंद महाराज उपस्थित होते .

‘बंजारा की बेटी मे सेवालाल की हु’ या गीताने व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत झाले. कार्यक्रम दरम्यान तेलंगण व महाराष्ट्र मधील कलाकारांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला . यावेळी शाम हरकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली ती देशाने काही काळात पचवली. संतांची परंपरा असल्याने भारत वाचला . परंतु ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेल्या धार्मिक आक्रमणामुळे देशात सात कोटी ख्रिस्ती बनले आहेत. हे ख्रिस्ती आपल्यातूनच झाले आहेत. आपल्यातून गेलेल्या लोकांना परत आणण्याची आपली हजारो वर्षांची परंपरा आहे. भक्तीने जागरण होते आणि समाज जोडला जातो .या कुंभासाठी पू बाबूसिंग व गोपाल चैतन्य महाराज सर्व संताना या कुंभासाठी निमंत्रित केले असे सांगितले.
पू. गोवर्धन महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात बंजारा समाज लढवय्या आहे. आपला समाज हिंदुत्व जगणारा आणि जोपासणारा आहे.आज काही विघातक शक्ती समाजात धर्मांतरण करत आहेत. विदेशी शक्ती हिंदुत्व तोडण्याचे प्रयत्न करत आहेत.” बंजारा आपली जात आणि हिंदू आपला धर्म ” विदेशी शक्तीचे कट कारस्थान हाणून पाडा असे सांगितले. विष्णू महाराज यांनी आपल्या उपदेशात आपण हिंदू आहोत आणि बंजारा जात आहे. जे गेले आहेत त्यांना परत आणू त्यांचे स्वागत करू. “धर्म जागृतीसाठी हा कुंभ असल्याचे सांगत बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास प्रकट केला. धर्माचे नोकर बनून धर्मातरीत झालेल्याशी संवाद साधून परत आणू असे संगितले.

गणेश राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनात असे कुंभ वेगवेगळ्या प्रांतात व्हावेत, बंजारा हिंदूच आहेत, धर्म जगण्यासाठी आवश्यक आहे. धर्म आणि शिक्षण एकत्र आले तर विकास होईल ,तांडा सुधार योजना ऍक्टिव्ह व्हावी असे सांगितले. डॉ .रणजितसिंग नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनात बंजारा समाज दयावान आहे. ” त्या लोकांची हिम्मत च कशी होते की तुम्ही हिंदू नाही असे म्हणायला .आदी काळापासून बंजारा समाज हिंदू धर्माची रक्षा करतो .राजस्थान मध्ये बंजारा समाजाचे इष्ट देव शंकर भगवान आहेत. असे सांगितले. साध्वी सिद्धेश्वरी दीदी यांनी आपल्या मार्गदर्शनात माझ्या समाजात धार्मिकता आहे. आपण हिंदू आहोत हे आपल्या बांधवांना सांगावे लागते .छोट्या छोट्या गोष्टीसाठी धर्म परिवर्तन होते.मुलांना शाळेत घालतांना ती कोणत्या धर्माची शाळा आहे याची माहिती घ्या . धर्मांतरण विरुद्ध संतांना यापुढेही पुढे यावे लागेल असे सांगितले.
संत हिम्मत महाराज यांनी समाज व्यसणापासून दूर राहिला पाहिजे, समाज श्रद्धावान आहे संत विचार घरा घरात पोहचले पाहिजे असे सांगितले.
हरी शरणानंद महाराज यांनी आपल्या भाषणात ” रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग बाह्य जग आणि मनाचा “,आपल्या छोट्याशा महत्वाकांक्षा मुळे आपण विभागलो गेलो.खुल्या आकाशात जगण्यासाठी सनातन धर्म आहे.” हम बदलेंगे तो युग बदलेंगा असे सांगितले.
महामंडलेशवर जनार्धन स्वामी यांनी आपल्या उपदेशात “हा म हिंदू छु” असे गौरमाटी भाषेत सांगत सुरुवात केली. आपल्याला आजार झाला असेल ,आजार ठीक करतो चर्च मध्ये चला असे कुणी संगितले तर त्याला सांगा मस्तक कटले तरी चालेल पण अन्य धर्मात जाणार नाही.” धड दिजीए धर्म न छोडीए” अनेक महापुरुषांनी सनातन धर्मासाठी बलिदान दिले आहे. आपण संतांचे ऐकून घ्या, एवढे संत एकाच मंचावर बसणे एकाच विचाराने एकत्र येणे हे कुंभाचे यश आहे.
बंजारा समाज अशिक्षित नाही जगण्यासाठी संस्कार आणि सांस्कृतिक आवश्यक आहे. बंजारा समाजात सांस्कृतिक दर्शन होते. संतांचे ऐका आणि त्यांचे उपदेश जीवनात अंगीकारावे. “हा म हिंदू छु ” चे स्टिकर बनवून घरोघरी लावा.हिंदू संस्कृती विश्वकल्याणासाठी प्रार्थना करते .आज आपल्याला पुरुषार्थ करण्याची संधी आहे. धर्म रक्षणासाठी महापुरुषांनी बलिदान दिले आहे. देश ,धर्म आणि समाज बलिदानाने बनतो,संतांनी बलिदान दिले आज राम मंदिर बनत आहे.” मतभेद चालतील पण मनभेद नकोत “, धर्मातरण होऊ नये म्हणून कुंभ,तुम्हाला संस्कृती आठवण करून देण्यासाठी व एकजूट करण्यासाठी कुंभ आहे असे सांगितले. राघवानंद महाराज यांनी आपल्या उपदेशात आपला समाज विघटित होत आहे हे दुःखद आहे, गौर बंजारा समाजा ला गौरवशाली इतिहास आहे पण समाज भटकत आहे.आपला धर्म सनातन धर्म आहे असे संगितले .