श्री साई समर्थ कृपा प्राथमिक शाळा येथे मराठी मातृभाषेचा गौरव व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा

श्री साई समर्थ कृपा प्राथमिक शाळा पाचोरा, येथे आज दि.27-2-2024 रोजी मराठी मातृभाषेचा गौरव व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.त्या निमित्ताने मराठी संस्कृती चा ठेवा जपणारे कार्यक्रम सादर केले.

श्री साई समर्थ कृपा प्राथमिक शाळा अंतूर्ली रोड पाचोरा येथे आज दिनांक 27/ 2 /2024 वार मंगळवार रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त शाळेच्या विद्ार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला .मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
अध्यक्षा – सौ. विद्या वानखेडे मॅडम
प्रमुख पाहुणे – तुषार भोसले सर तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी चे महत्त्व सांगितले. संस्कृतीचा ठेवा कसा जपायचा याचे महत्त्व पटवून सांगितले.
इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कल्याणी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी स्वरांजली इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सेजल इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी नूतन या विद्यार्थिनींनी गौरव महाराष्ट्राचा या गीतार नृत्य सादर केले .इयत्ता पाचवीचा विद्यार्थी रुद्र यांनी मराठी राजभाषा आपली ही कविता सादर केली. बहुतांश विद्यार्थ्यांनी बालगीत सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. व कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.