क्रांतिवीर खाज्यासिंह भिल बलिदान दिनानिमित्त भव्य मोटर सायकल रॅली

क्रांतिवीर खाज्यासिंह भिल बलिदान दिनानिमित्त भव्य मोटर सायकल रॅली

जळगाव प्रतिनिधी :- एकलव्य संघटना आयोजित क्रांतिवीर खाज्यासिंह भिल बलिदान दिनानिमित्त धरणगाव येथील समाधीस्थळी अभिवादन सभा घेण्यात आली.
थोर क्रांतिकारक खाज्यासिंह भिल यांच्या बलिदान दिनानिमित्त एरंडोल येथून भव्य मोटर सायकल रॅली काढून धरणगाव येथील स्वर्गीय क्रांतिकारी खाज्यासिंह भिल यांच्या समाधीस्थळी विनम्र अभिवादन समस्त भिल्ल बांधवांकडून करण्यात आले. तत्पूर्वी धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शहरातील विश्वकर्मा मजूर सोसायटी हॉल येथे अभिवादन पर सभा आयोजित करण्यात आली होती.

संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवन राजे सोनवणे व संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या मार्गदर्शनात भव्य मोटर सायकल रॅली व समाधी स्थळाला विनम्र अभिवादन समस्त भिल्ल बांधवांच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब बर्डे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पवार सर प्रदेश सचिव सचिन कुमार बर्डे योगेश जी सूर्यवंशी सुनील गांगुर्डे विनोद गायकवाड रमेश शिंदे पंजाबराव पवार नितेश बर्डे इत्यादी लाभले होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संजय सोनवणे रविंद्र सोनवणे निवृत्ती पवार सुनील ठाकरे नंदू राव पवार अनिल सूर्यवंशी गणेश बर्डे आत्माराम गायकवाड ऋषी दादा सोनवणे संपत पवार विकी गायकवाड गजानन पवार पवन बर्डे भारत बर्डे दामू मालचे इत्यादी लाभले होते.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन सुरेश सोनवणे संजय वाघ पिंटू सोनवणे पिंटू गायकवाड रोहिदास जाधव सुभाष मालचे समाधान मालचे संजय पवार वाल्मीक सोनवणे गणेश गायकवाड गणेश वाघ दशरथ मोरे मोती पवार मंगल सोनवणे विलास मोरे राजेंद्र वाघ सुशील सोनवणे सचिन सोनवणे ईश्वर बिल जय मोरे राहुल सोनवणे विनोद मोरे दादाभाऊ बहीरम राहुल ठाकरे गणेश मोरे विनोद मालचे प्रवीण पवार लक्ष्मण गायकवाड दिवसं सोनवणे पंढरीनाथ सोनवणे कृष्णा मालचे गोविंदा वाघ भगवान भिल दिनेश गायकवाड प्रवीण मालचे किरण मोरे समाधान गायकवाड इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन करून स्वर्गीय क्रांतिकारी खाज्या सिंहभिल यांच्या बलिदान दिनानिमित्त भव्य मोटर सायकल रॅली काढून त्यांच्या समाधी स्थळाला नतमस्तक होत समस्त भिल्ल बांधवांकडून विनम्र आदरांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.