पाचोरा तालुका कॉग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी कल्पेश येवले

पाचोरा तालुका कॉग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी कल्पेश येवले

संकल्प सप्ताहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सोशल मीडिया चे काम जोरात सुरू झाले असून तालुका अध्यक्षपदी कल्पेश येवले यांची निवड करण्यात आली आहे

देशाचे नेते खा राहुल गांधी यांचा वाढदिवस पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह म्हणून साजरा करीत असुन यात पक्ष प्रवेश सोबतच आंदोलने, निदर्शने सह विविध सेल वर नियुक्ती करण्यात येत आहे. यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सोशल मीडिया च्या जळगाव जिल्हा अंतर्गत पाचोरा तालुका अध्यक्ष पदासाठी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लोहटार येथील कल्पेश येवले यांची निवड केली आहे. या नियुक्ती चे पत्र नुकतेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर प्रदेश काँग्रेस च्या कार्याध्यक्षा तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरा पर्यंत सोशल मीडिया च्या माध्यमातून कॉग्रेस ची विचार धारेला पोहचविण्याचा संकल्प नुतन अध्यक्षाने घेतला आहे