स्वातंत्र्य सैनिक सुपुत्रांचा क्रिएटिव्ह स्कूल ला जाहीर सन्मान

स्वातंत्र्य सैनिक सुपुत्रांचा क्रिएटिव्ह स्कूल ला जाहीर सन्मान

नांद्रा ता. पाचोरा ( प्रतिनिधी)- येथे 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र उत्सव साजरा करण्यात आला,15 ऑगस्ट रोजी माजी सैनिक आबासाहेब मन्साराम सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते क्रिएटिव्ह स्कूल ला ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी 1942 च्या चलेजाव चळवळीत नांद्रा येथील तीन थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी लोटन सोनजी सूर्यवंशी, थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी माधवराव लाला सूर्यवंशी, थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी कपूरच्या नथमल मुथा यांनी सक्रिय सहभाग घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता त्यामुळे गावाचा सन्मान वाढला व त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा ही जाहीर सन्मान व्हावा म्हणून क्रिएटिव्ह स्कूल ला त्यांचे सुपुत्र अनुक्रमे विश्वनाथ लोटन सूर्यवंशी,पंडित माधवराव पाटील,लखीचंद कपूरचंद मुथा यांचा क्रिएटिव्ह स्कूल तर्फे प्रा. यशवंत पवार व ओम भाऊ पवार यांनी शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह,मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी सरपंचपुत्र विनोद तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे,ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ सूर्यवंशी, विनोद आप्पा बाविस्कर,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष आप्पा बाविस्कर, पिंटू भाऊ बोरसे,स्वप्नील बाविस्कर, संदीप पाटील, भागवत गोसावी, बंटी सोनावणे,ओम भाऊ पवार,हिरालाल सूर्यवंशी,राजीव भाऊ पत्रकार,नामदेव पाटील, विजू पाटील,नवल पाटील सुधाकर पाटील हे उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले व त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी नम्रता पवार,अरुंधती राजेंद्र वैशाली पाटील,जयश्री पाटील, श्वेता पाटील पूजा काळे श्वेता बोरसे,पूजा धोबी,सुभाष पिंपळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वृंद जयश्री पाटील व श्वेता पाटील तर प्रास्ताविक प्रा यशवंत पवार यांनी केले