चोपडा महाविद्यालयात विज्ञान दिवसानिमित्त आयोजित पोस्टर व पी. पी. टी. प्रेझेन्टेशन स्पर्धा संपन्न

चोपडा महाविद्यालयात विज्ञान दिवसानिमित्त आयोजित पोस्टर व पी. पी. टी. प्रेझेन्टेशन स्पर्धा संपन्न

चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ‘विज्ञान दिवस’ साजरा करण्यात आला. या विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दि. ०९ मार्च रोजी ‘महाविद्यालयस्तरीय पोस्टर व पी.पी.टी. प्रेझेन्टेशन स्पर्धेचे’ आयोजन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील तसेच प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इलेक्ट्रोनिक्स विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. एल. चौधरी हे उपस्थित होते तसेच उदघाटक म्हणून उपप्राचार्य एन. एस. कोल्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. एस. लोहार आदि उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण गणित विभाग प्रमुख डॉ. एच. जी. चौधरी व भौतिकशास्र विभागातील डॉ. व्ही. आर. हुसे यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के.डी.गायकवाड यांनी केले.
या स्पर्धेत एकून ३० पोस्टरसह ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील उत्कृष्ट पोस्टर प्रेझेन्टेशन करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिकदेऊन गौरविण्यात आले. त्यात पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये एफ. वाय. बी. एस्सी मधून प्रथम क्रमांक सिधी जाधव, रोशनी बोरसे, पूजा पाटील यांनी पटकावला तसेच एस. वाय. बी. एस्सी. मधून प्रथम क्रमांक पुष्कर पाटील, गोपाल बाविस्कर यांनी पटकावला तर पी. पी. टी. प्रेझेन्टेशन मध्ये एफ. वाय. बी. एस्सी. मधून प्रथम क्रमांक कैलास शरद कोळी, चेतन पाटील यांनी पटकावला आणि एस. वाय. बी. एस्सी. मधून प्रथम क्रमांक यश पाटील , प्रथमेश सनेर यांनी पटकावला व टी. वाय. बी. एस्सी. मधून प्रथम क्रमांक निरज पिसोळकर याने पटकावला.
याप्रसंगी उपप्राचार्य एन. एस.कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. ए. एल. चौधरी म्हणाले की, विज्ञानामुळे रोजगार मिळत आहे तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवीन टेक्नोलॉजी निर्माण झाल्या व त्याचा फायदा आपल्या दैनंदिन जीवनात होत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा वापर करून नव नवीन प्रयोग केले पाहिजे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शेक्षणिक जीवनात विज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले. परीक्षक डॉ. एच. जी. चौधरी व डॉ. व्ही. आर. हुसे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी सौ. पुनम गाडगीळ, निशा पाटील, रोहन सोनवणे, धीरज राठोड, व्ही.एम. शुक्ल व टी.वाय. बी. एस्सीचे विद्यार्थी इत्यादींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. डी. गायकवाड यांनी केले तर डॉ. एल. बी. पटले यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.