जळगाव जिल्ह्यातील शैलेश लक्ष्मिकांत कुलकर्णी यांनी रांगोळी या कलेमध्ये आपला ठसा उमटवूंन थेट एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्‍ये नोंद केली

हिंदू धर्मातिल कोणताही सण असो वा शुभकार्य ते रांगोळी शिवाय अपूर्णाच प्रत्येक सणाला सगळ्यांच्या अंगणात जणु रांगोळीचा सडाच आपल्याला पाहावयास मिळतो.वेगवेगळे रंग पाहुन मन भरुन जायला होत. परंपरेनुसार घरातील स्त्रिया अंगणात रोज सकाळी रांगोळ्या काढताना दिसतात. वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवगळ्या रांगोळी आपणास पहावयास मिळतात. ठिपक्यांची रांगोळी पहावयास मिळते . तसेच आजच्या काळात रांगोळी क्षेत्रात सुध्धा भरपूर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यात 3 डी रांगोळी, टू इन वन रांगोळी, पोस्टर रांगोळी, पोट्रेट रांगोळी, जलचित्र रांगोळी ,अनमॉर्फिक रांगोळी अश्या अनेक प्रकराच्या रांगोळी आज आपणास पाहावयास मिळतात. आज आपणास महिलाच नाही तर पुरुष देखिल मोठया प्रमाणावर रांगोळी साकारताना दिसतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी नवरात्री गणपती उत्सवी औचित्य साधून रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. रांगोळी परंपरागत चालत आलेली गोष्ट आ हे.
आज रांगोळी क्षेत्रात विविध कलाकार आपणास परिचयाचे दिसतात.त्यात आपल्या जळगाव जिल्ह्यातील श्री. शैलेश लक्ष्मिकांत कुलकर्णी ज् यानी रांगोळी या कलेमध्ये आपला ठसा उमटवूंन थेट एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्‍ये नोंद केलीय. अशा कलाकाराची ओळख आपण आज करून घेणार आहोत. त्यान्नी आजपर्यंत 150 च्‍या वर रांगोळी कलाकृती साकारलेल्या असुन 100 च्‍या वर विविध पुरस्कारांनी त्यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर ई. थोर व्यक्तींच्‍या रांगोळ्या त्यांनी रेखाटल्‍या आहेत.