श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर

श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर

 

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर – 2023-24 खडकदेवळा खु.ll, ता. पाचोरा येथे पाचव्या दिवशी महाविद्यालयाच्या कार्यालयाकडून दि. 06 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 09:00 वाजता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बारावी गुणपत्रक वितरण, बोनाफाईड प्रमाणपत्र वितरण, बस पासेस अर्ज वितरण, ओळखपत्र वितरण व मतदान नोंदणी कार्यक्रम अशा विविध सेवांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. राजेश वळवी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, वरिष्ठ लिपिक श्री. ऋषिकेश ठाकूर, श्री. अभिषेक जाधव, श्री. संतोष महाजन, श्री. रवींद्र चौधरी, श्री. नाना पाटील, श्री. सुधाकर पाटील व श्री. यश सूर्यवंशी यांनी या शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक-स्वयंसेविकांनी या शिबिराचा लाभ घेतला.