कासार पिंपळगाव गटात हिरमुसलेल्या मतदारांना खा.सुजयदादा विखे यांच्या दाळ साखर वाटपाने नवसंजीवनी
(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी अयोध्येतील राममंदिर सोहळ्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात साखर दाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बावीस जानेवारीला अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद अनेकांनी घेतला परंतु पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगावात गटातील काही गावांमध्ये दाळ साखर वाटपास विलंब झाला होता.म्हणून सामान्य नागरिक नाराज झाले होते.शेजारील गावात जवखेडे, हनुमान टाकळी, कोपरे, पाडळी या गावात साखर वाटप करण्यात आले होते.शेजारील गावातील एकमेकांचे नातेवाईक तुम्हाला कशी दाळ साखर मिळाली नाही म्हणून सारखी विचारणा करीत होते.सामांन्य मतदारांची नाराजी खासदार साहेबांना कळताच त्यांनी लगेच आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून दाळ साखर वाटप केल्याने हिरमुसलेल्या मतदारांना नवसंजीवनी मिळाली.आणि नाराज झालेल्या मतदारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमललेले दिसून आले.कासारपिंपळगाव जिल्हा परिषद गटातील डांगेवाडी, खेर्डे, सांगवी, पागोरी पिंपळगाव, प्रभू पिंपरी,साकेगाव, चितळी,ढवळेवाडी, मढी या गावात साखर दाळ वाटण्यात आली.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,अभयकाका आव्हाड, अजय रक्ताटे,विष्णूपंत अकोलकर, सुभाषराव ताठे, शेषराव कचरे,अंजाबापू गोल्हार,संजय कुलकर्णी, चंद्रकांत सोलाट, गवळी पाटील,ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,चितळीचे सरपंच अशोक आमटे, ग्रामपंचायत सदस्य बाबा आमटे, यांच्या सह अनेक गावांतील मांन्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरील सर्व गावात एकाच दिवशी दाळ साखर वाटप कार्यक्रम संपन्न झाला.खासदार साहेब अचानक दिल्लीला रवाना झाल्या मुळे काही गावांमध्ये विखेपाटील यंत्रणेनेच्या माध्यमातून दाळ साखर वाटप करण्यात आली, उर्वरीत गावात ही दाळ साखर वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कासार पिंपळगावात नानासाहेब देशमुख, देविदास राजळे,खरड महाराज, शिवाजी खोजे, तुकाराम कांबळे, संतोष लवांडे हे आवर्जून उपस्थित होते.

























