जवखेडे खालसा येथे “लोकमाता पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक” नामकरण सोहळा संपन्न

जवखेडे खालसा येथे “लोकमाता पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक” नामकरण सोहळा संपन्न

‌‌ (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे मोहोज,कामतशिंगवे, हनुमान टाकळी, कासार पिंपळगावा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाचे”लोकमाता पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक” असे नामकरण करण्यात आले. या फलकाचे अनावरण जवखेडे गावचे धनगर समाजाचे नेते आणि माजी सरपंच शिवाजीराव मतकर,व ह.भ.प. बाबासाहेब मतकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. फलकाची जागा ही संपूर्ण धनगर समाजाचीच आहे.या चौकाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे ही अनेक दिवसांपासूनची धनगर समाजाची मागणी होती .ती नवनिर्वाचीत लोक नियुक्त सरपंच चारुदत्त उद्धवराव वाघ यांनी लेखी परवानगी देउन मांन्य केली. ग्रामपंचायत सदस्य इरफान पठाण,अमोल मतकर, अमोल वाघ, अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा नामकरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी भानुदास मतकर, राजेंद्र मतकर सर, जगन्नाथ पाचे सर, सोमनाथ मतकर, संतोष मतकर, रामदास मतकर, कैलास मतकर, नारायण मतकर, वसंत मतकर, सोपान मतकर, कुशिनाथ मतकर,कडूबाळ मतकर, आदिनाथ मतकर, देविदास मतकर, तुळशीराम मतकर, मच्छिंद्र देशमुख, अर्जुन फाटक, उद्धव आंधळे, नवनाथ घाटूळ,भागवत घाटूळ, बबलू शेख, अशोक धनवडे, राजेंद्र धनवडे, किशोर भोसले,सोनू शेख ई.मांन्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. भाऊसाहेब रामराव मतकर यांनी या चौकात अहिल्यादेवीचा नवीन पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी केली आहे.या कार्यक्रमात धनगर समाजाच्या सर्वच नेत्यांची एकजूट दिसून आली.