राज्यातील सर्व गावठाणांमधील जमिनीचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करून केंद्र शासनाने स्वामित्व योजना गोराडखेडा येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले

राज्यातील सर्व गावठाणांमधील जमिनीचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करून केंद्र शासनाने स्वामित्व योजना सुरू केली आहे. या योजनेच्या कामाला पाचोरा तालुक्यात सुरूवात झाली असून याअंतर्गत गोराडखेडा येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यात ड्रोनद्वारे गावाचा सर्व्हे करून गावठाणाची मोजणी करत सीमांकन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावठाण क्षेत्राची मोजणी आता अत्याधुनिक प्रणालीद्वारे होत आहे. यापूर्वीच्या नोंदणीत व आताच्या वास्तव्यास झालेला बदल, विस्तारलेली गावांची माहिती आता अद्ययावत केली जात आहे. त्यादृष्टीने स्वामित्व योजनेंतर्गत गावाच्या गावठाण क्षेत्राची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात आली. ग्रामपंचायत गोराडखेडा बु उपसरपंच विजय पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करत मोजणीस सुरूवात झाली. मोजणीसाठी भारतीय सर्वेक्षण विभागाचे कर्मचारी नवनाथ उगलमुगले व मोहन डेरे उपस्थित होते. प्रसंगी सरपंच पती जनार्दन पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार, मनोज पाटील, गोपाल पाटील यासह शौर्य पाटील, दीपक पाटील, सुखदेव पाटील आदी उपस्थित होते.