Home जळगाव कासोद्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे घडले दर्शन

कासोद्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे घडले दर्शन

कासोद्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे घडले दर्शन

जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यातील कासोदा ता, एरोंडोल सह जिल्ह्यात सध्या सर्वीकडे कोरोनाने थैमान घातले असून यावर राज्य सरकार व प्रशासनाने वेगवेगळे निर्बंध लावून दिले आहे.
याच कोरोनामुळे एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे एक वयोवृद्ध महिला शांताबाई बाविस्कर या महिलेचे दिनांक 24 एप्रिल संध्याकाळी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले , यासाठी कोणीही महिलेच्या अंतविधीस पुढे आले नाही हे पाहुन कासोदा गावातील ग्रामपंचायत सदस्य पुत्र अशपाक अली यांनी व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य अर्शद अली मुखतार अली, सद्दाम पिंजारी ,मुश्रीफ पठाण ,अमजद खान, जाकीरअली रियाज शेख, नफीस शेख, जमील पिंजारी ,तजमुलशेख मुरसलीन शेख, तोसीफ शेख आदि मुस्लिम समाज बांधवांनी पुढाकार घेऊन महिलेचा अंत्यसंस्कार केला , या पवित्र रमजान महिन्यात या सर्वांनी पुढाकार घेत कोरोना सारख्या साथरोग संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर हा पुढाकार घेतल्याने त्यांचे … सर्वत्र कौतुक होत आहे

Don`t copy text!