गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचा जयदीप सोनवणे जिल्हास्तरीय १०० मी.धावण्याच्या स्पर्धेत प्रथमस्थानी

गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचा जयदीप सोनवणे जिल्हास्तरीय १०० मी.धावण्याच्या स्पर्धेत प्रथमस्थानी ….!!!!!!

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील इयत्ता ११ वीचा विद्यार्थी चि.जयदीप कैलास सोनवणे याने क्रीडा व युवकसेवा संचलनालय,पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फै छ.शि.महाराज,क्रीडा संकुल,जळगाव येथे आयोजित १७ वर्षाआतील जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत १०० मी.धावणे क्रीडा प्रकारात प्रथमस्थान प्राप्त केले असून त्याची नाशिक येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जयदीप यांस कार्यवाहक रघुनाथ पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,कैलास सोनवणे,सुरेश पैलवान,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
चि.जयदीपच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रा.राजेश जाधव,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.