सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न

सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेतर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न
दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए

पाचोरा (प्रतिनिधी)
सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल दिया है जान भी देंगे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी देविदास थोरात केंद्र संचालक बबन वाघ, रोशनलाल शर्मा , विठ्ठल महाजन आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले रितेश प्रजापत पंकज धनराळे रितेश धनराळे विशाल थोरात कचरू पाटील (साऊंड ऑपरेटर) सार्थक थोरात, वृंदा थोरात, प्रिन्स थोरात, पूर्वा थोरात बालकलाकार आदींनी अनेक अजरामर देशभक्तीपर गीत सादर केलेत व प्रेक्षकांचे मन जिंकलेत कार्यक्रमाच्या शेवटी सागर थोरात यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.