पडत्या काळात सदैव खंबीरपणे पाठीशी उभं राहणाऱ्या सरस्वती मतकर (मामी) यांचं दुःखद निधन
(अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे सरोदे वस्तीजवळ राहणाऱ्या आणि आमच्या पडत्या काळात खंबीरपणे सदैव आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सरस्वती रामचंद्र मतकर (मामी) यांचं अचानक 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी वयाच्या 75व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांना दोन भाऊ आणि तिनं बहीणी होत्या.त्यांच्या अचानक जाण्याने मतकर परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या अतिशय मनमिळाऊ आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या.पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटेठाण येथिल विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे सुप्रसिद्ध महंत परमपूज्य श्री सुमंत बापुजी हंबिर यांच्या त्या परमभक्त सेविका होत्या. सुमंत बापुजींनी अनेक वेळा त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन आशिर्वादही दिले आहेत. राहुरीचे युवा नेते भारत मतकर आणि विजय मतकर यांच्या त्या मातोश्री होत्या.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपला प्रपंच उभा केला. कमी शिकलेल्या परंतु नावाप्रमाणेच सरस्वतीच वरदान लाभलेल्या मामींनी अध्यात्माचे धडे घेण्यासाठी महंत सुमंत बापुजींना आपले अध्यात्मिक गुरू मानले होते.आपल्या दोन्ही मुलांना आणि दोन्ही मुलींना चांगले शिक्षण देण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांनी पुर्ण केली होती.आपले पती रामचंद्र मतकर यांना त्या कायम “मालक” या नावाने संबोधत असत. नणंद,दीर,भावजया, जाऊबाई यांच्यामध्ये त्या नेहमी रमत असत. त्यांच्या गोड स्वभावामुळे त्या सर्वांना हव्या हव्याशा वाटत होत्या.राहुरीतील सरोदे परिवार हे त्यांचे माहेर होते.त्यांना दोन भाऊ आणि तिनं बहीणी होत्या.तर पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील मतकर परीवार हे त्यांचे सासर आहे.त्यांना दोन दीर आणि तिनं जाऊबाई आहेत.राहुरी हे त्यांचे माहेर असल्यामुळे गावातील सर्व लहान थोर व्यक्तींशी त्यांची अतिशय चांगली ओळख व परिचय झाला होता. दारात आलेल्या पै पाहुण्यांना कधिही त्यांनी विन्मुख होउन जाउ दिलं नाही. दारात आलेला पाहुणा कधीही उपाशीपोटी जाऊ नये ही त्यांची अध्यात्मिक धारणा होती.काही तरी पाहुणचार केल्या नंतर त्या पाहुण्यांना वाटे लावत असत. राहुरी पंचक्रोशीतील अनेक गावांतील ठिकाणी त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांचा पाहुण्यांशी चांगलाच जनसंपर्क होता.त्यांच्या अंत्यविधीसाठी फार मोठा जनसागर उसळून रस्त्यावर अत्यंत गर्दी झाली होती.त्यांच्या मालकांचा घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्याचा व्यवसाय असल्यामुळे संपूर्ण राहुरी शहरात त्यांनी चांगल्याप्रकारे आपली ओळख निर्माण केली होती. सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्षेत्रातील व्यक्तींशी मतकर परीवाराचे सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्या घरीही भेटीसाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पती रामचंद्र सखाराम मतकर,मुले भारत मतकर व विजय मतकर,विवाहित मुली छाया खिलारी आणि शोभा काळे व सुनबाई ज्योती मतकर,7 नातवंडे असा परिवार आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाच्याने भेट म्हणून दिलेली साडी त्यांना अतिशय प्रफुल्लित,आकर्षीत, हर्षीत,मोहीत,आनंदीत करून गेली होती.अशा या सरस्वतीच वरदान लाभलेल्या आणि अनंत काळाच्या प्रवासाला गेलेल्या सरस्वती मतकर मामींच्या 17 मार्च 2025 रोजी राहुरीच्या गणपती घाट येथे होणाऱ्या दशक्रिया विधी निमित्ताने आपल्या लाडक्या भाच्याकडून विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली ! या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटेठाण
येथील विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे सुप्रसिद्ध महंत परमपूज्य सुमंत बापुजी हंबिर यांचे प्रवचन होणार आहे. आपले शोकाकुल/दु:खांकित सरोदे/मतकर परीवार/लाडका भाचा
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
























