पाचोरा येथील सुषमा पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

पाचोरा येथील सुषमा पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

पाचोरा – येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका सुषमा पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय नागरीरत्न विभागातील शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय व्यंकटराव जाधव यांनी ह्या पुरस्काराची घोषणा केली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची नाशिक विभागीय भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी, राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह, धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमती सुषमा पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती म. ज्यो.फुले शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे. डी. काटकर यांनी सुषमा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.