श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.संस्थेचे चेअरमन मा.नानासाहेब संजय वाघ,व्हाईस चेअरमन नानासो व्ही.टी जोशी, शालेय समिती चेअरमन बापूसाहेब जगदीश सोनार,शालेय समिती सदस्य दादासो.अर्जुनदास पंजाबी, दादासो.योगेश पाटील,संस्थेचे समन्वयक जीभुसो एस.डी. पाटील सर यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.सारिका पाटील मॅडम यांचा आदर्श शिक्षक पुरस्कसर मिळाल्याने संस्थेच्या वतीने मा. नानासाहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रसंगी मा. नानासाहेबांनी सर्व शिक्षक वृंदास मार्गदर्शन करून शालेय प्रगतीसाठी आवश्यक सूचना केल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री मनोज पवार सर यांनी केले