डॉ. मुकुंद सावनेरकर यांना झालेल्या मारहाणीच्या आरोपिंना तात्काळ अटक करा

डॉकटर मुकुंद सावनेरकर यांना झालेल्या मारहाणीच्या आरोपिंना तात्काळ अटक करा.!!!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी

पाचोरा प्रतिनिधी :-

शहरातील सावनेरकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुकुंद सावनेरकर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेला एक महिना उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. यामुळे शहरात संतापाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे किशोर रायसाकडा यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. सावनेरकर हे एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. त्यांना अशा प्रकारे मारहाण करणे ही कायद्याची आणि समाजाचा अपमान आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली

 

पाचोरा शहरातील सावनेरकर हाॅस्पिटलचे संचालक डॉ. मुकुंद सावनेरकर यांना १८ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या हाॅस्पिटलमध्ये येवुन भागवत रुपचंद पाटील व अनोळखी ७ जणांनी मारहाण केली. डॉ. मुकुंद सावनेरकर यांनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला असुन एक महिना उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे किशोर रायसाकडा यांच्या नेतृत्वात निवेदन देत मागणी केली आहे.

यावेळी किशोर रायसाकडा, नंदकुमार शेलकर, अनिल आबा येवले, प्रमोद सोनवणे, अबरार मिर्झा,भुवनेश दुसाने, जावेद शेख,सुरेंद्र मोरे, सुनील कोळी, शेखर पाटील, आदी उपस्थित होते