वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतले पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे आशीर्वाद 

वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतले पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे आशीर्वाद

चाळीसगाव, दिनांक २० (प्रतिनिधी ) : चाळीसगाव येथे सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी आज कथेस्थळी उपस्थिती देऊन आशीर्वाद घेतले.

चाळीसगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या विद्या वाचस्पती पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेची आज सांगता झाली. लाखो भाविकांच्या उपस्थितीतत पार पडलेल्या या कथेच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी उपस्थिती दिली. त्यांनी व्यासपीठावर जाऊन पंडितजींचे आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांनी मंडपात बसून कथेचे श्रवण केले.
याप्रसंगी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या अर्धांगिनी संपदाताई पाटील यांनी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या सोबत फुगडी खेळून तसेच भजनावर ताल धरून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी मंडपात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील, आ. मंगेशदादा चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदींसह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती होती.