ॲड. किरण तेली यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव 

ॲड. किरण तेली यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

 

जळगांव विशेष प्रतिनिधी :- ॲड. किरण रामदास तेली यांचा साप्ता. खान्देश बाजार व दिशा राज फाउंडेशनच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कोण आहेत ॲड किरण तेली:- ॲड किरण तेली हे जळगांव जिल्हा न्यायालयात मागील 7 वर्षापासून वकीलीची प्रैक्टिस करत असून अनेक संस्थांवर पदाधिकारी देखील आहेत तसेच ते मागील 10 वर्षांपासून वकीली सोबत समाज प्रबोधनाचे देखील कार्य करीत असून समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत आहेत त्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा व गती मिळत आहे त्यामुळेच त्यांचा गौरव करण्यात असल्याचे संस्था अध्यक्ष पंकज सिंधी यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी व्यक्त केले.

काय म्हटले आहे त्यांच्या सन्मानपत्रात:- आपल्या सामजिक क्षेत्रातील कार्यामुळे समाजाला व देशाला दिशा मिळत असून राष्ट्र निर्मितीच्या कार्याला बळ मिळत आहे आपल्या सारख्या महनीय व्यक्तींमुळेच देशाचा पाया भक्कम होत असतो आणि राष्ट्राची उन्नती देखील वेगाने होत असते आपला गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे असे समाजभूषण पुरस्कार गौरवपत्रात म्हटले आहे.

 

ॲड किरण तेली यांना समाजभूषण पुरस्कार पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.