एम. एम. महाविद्यालयात वाणिज्य विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार संपन्न

एम. एम. महाविद्यालयात वाणिज्य विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
दि. 05 पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘फायन्सिल इम्पोओरमेन्ट थ्रू वेल्थ क्रियशन’ या आर्थिक विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनारमध्ये सेबीचे माजी उपव्यवस्थापक व वरिष्ठ सल्लागार (एएमएफआय) श्री. सूर्यकांत शर्मा यांनी मार्गदर्शन केले. ते आपल्या वक्तव्यात म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय व सरकारी गुंतवणुकीच्या अनेक योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारी गुंतवणूक योजना, रोखे, म्युच्युअल फंड, एस. आय. पी., एन. पी. एस., शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, विविध बॉन्ड्स, क्रिप्टो करेंसी, बिटकॉइन हे गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय आहेत. त्यामध्ये अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड हा सर्वाधिक सुरक्षित व सर्वाधिक लोकांनी पसंत केलेला पर्याय होय. इतर पर्यायांच्या मानाने म्युच्युअल फंडमध्ये जोखीम कमी असते. म्युच्युअल फंडमधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) च्या माध्यमातून आपण दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मोठा लाभ होऊ शकतो. त्यासाठी कमी वयात व
उत्पन्न सुरू झाल्याबरोबर एस. आय. पी. मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. हे सोदारणासह स्पष्ट केले.
या ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भविष्यातील गुंतवणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनारला महाराष्ट्र व इतर राज्यातून 215 हून अधिक प्राध्यापक, अभ्यासक व विद्यार्थी-विद्यार्थिनी ऑनलाईन उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक प्रा. एस. टी. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. संजिदा शेख, प्रमुख वक्त्यांचा परिचय वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. योगेश पुरी यांनी केला तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. तडवी यांनी आभार मानले. या वेबिनारसाठी डॉ. के. इस. इंगळे, डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. महेंद्र मिस्तरी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.