श्री गो .से. हायस्कूल पाचोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शाळेतील सर्व शिक्षिका भगिनींचा सन्मान

श्री गो .से. हायस्कूल पाचोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शाळेतील सर्व शिक्षिका भगिनींचा सन्मान

 

 

पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री गो .से. हायस्कूल पाचोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शाळेतील सर्व शिक्षिका भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीमती अभिलाषा ताई रोकडे (राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा, उत्तर महाराष्ट्र विभाग) या उपस्थित होत्या, त्यांच्यासोबत श्रीमती नम्रता पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाप्रमुख सोशल मीडिया विभाग) व अभिलाषा ताईंचेबंधू अभिषेक रोकडे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या शाळेच्या पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल मॅडम यांनी स्वीकारले. त्यांचे सोबत मंचावर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता पाटील मॅडम या ही उपस्थित होत्या.शाळेतर्फे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मग मान्यवरांच्या हस्ते आद्य शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना सर्वांनी वंदन केले .तद्नंतर सर्व शिक्षिका भगिनींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी आमच्या महिला शिक्षिका भगिनींसोबत अभिलाषा ताई यांनी शाळेतील शिक्षक भगिनी यांच्या कार्याचे कौतुक करत हितगुज साधले. अध्यक्षीय भाषण सौ.ए आर गोहिल मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्रीमती एस ए पवार मॅडम यांनी केले.