भाषा शिक्षण मध्ये अडथळा नाही ‘संजिदा शेख’ !!!!

भाषा शिक्षण मध्ये अडथळा नाही ‘संजिदा शेख’ !!!!

नगरदेवळा येथे उर्दू शालेय व्यवस्थापन समिती तर्फे एक शैक्षणिक कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला.या कार्यक्रम मध्ये जि.प उर्दू शाळेतून शिकलेली संजिदा शेख दादा मिया यांचा सत्कार करण्यात आला. संजिदा शेख यांनी SET परीक्षा उत्तीर्ण करून बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये एम.ए इंग्रजी विषय मध्ये सुवर्णपदक पटकावलेला आहे. यावेळी संजिदा शेख यांनी आपल्या भाषण मध्ये आपले व्यक्तीक जीवन, शैक्षणीक जीवन मध्ये येणारी उतार उतार चढाव सह दाखवले की उच्च शिक्षण साठी भाषा अडथळा निर्माण करत नाही. मातू भाषा मध्ये तेज गतीतून शिकण्याची संधी मिळते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आदर्श शिक्षक शेख सलीम लाल उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून सेल टॅक्स इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर परदेशी,कवी व लेखक साबीर मुस्तफा आबादी, केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर, सामाजिक कार्यकर्ता अजहर खान मोतीवाला, तालिब कुतबोद्दिन, अभिलाषा रोकडे, दादा मिया शेख उपस्थित होते.सलीम लाल यांनी *आधुनिक युग मध्ये पालकांची भूमिका* विषयावर तर शेख कदिर यांनी आधुनिक युगाचे विद्यार्थीला डिस्ट्रेक्शन व त्याच्या उपाय वर प्रकाश टाकला. ज्ञानेश्वर परदेशी सर यांनी स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केले.यावेळी मोठ्या संख्या मध्ये पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम गुलाम मोहम्मद, उपाध्यक्ष अफरोज रहीम,सदस्य अन्सार शेख, मुश्ताक खान,उमर बेग,नासिर मणियार, इमरान आसिफ,वसीम पटवे, जुबेर खान, शेख जावेद रहीम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मध्ये अब्दुल गनी सेठ, नूर बेग, जाकीर सर, उपस्थित होते सुत्र संचालन साबीर मुस्तबादी यांनी केले. कार्यक्रम नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री वाटप करण्यात आली.