श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा कार्यक्रम संपन्न

श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा कार्यक्रम संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे आज दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रमिल एम.वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उप मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे , पर्यवेक्षक आर. एल. पाटील ,ए.बी. अहिरे , सौ.अंजली गोहिल , किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर ,तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील , सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी , कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

रुपेश पाटील व सागर थोरात यांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. आर.बी.बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.