शिवसेना (उबाठा) तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
पाचोरा – दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेतर्फे शहराच्या मध्यवर्ती शिवतीर्थ या शिवसेना कार्यालय येथे शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, रमेश बाफना, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, माजी उपजिल्हाप्रमुख अभय पाटील शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख दीपक पाटील, मा. नगरसेवक दत्ताभाऊ जडे, मा. नगरसेवक दादाभाऊ चौधरी, फईम शेख, माजी जि प सदस्य राजू भैय्या पाटील, पप्पू राजपूत, शहर संघटक राजेंद्रसिंग राणा एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख अजय पाटील, संजय चौधरी, अभिषेक खंडेलवाल, नितीन लोहार, गफार सय्यद, पप्पू जाधव, धर्मा पाटील, अतुल चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख भूपेश सूर्यवंशी. युवा सेना शहर प्रमुख हरीश देवरे प्रशांत सोनार महिला आघाडीच्या सौ अनिता पाटील, जयश्री ताई येवले, मंदाकिनी पारोचे तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

























